ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट

ENG vs PAK 2nd T20 : सध्या पाकिस्तान इंग्लंड दौऱ्यावर असून, तिथे चार सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 05:51 PM2024-05-26T17:51:41+5:302024-05-26T17:52:53+5:30

whatsapp join usJoin us
 ENG vs PAK 2nd T20 Pakistan former cricketer Kamran Akmal said, Players are getting selected in Pakistan's team on yaari dosti | ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट

ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान संघाला दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात पराभव पत्करावा लागला. पाकिस्तानचा पराभव होताच नेहमीप्रमाणे शेजारील देशातील माजी खेळाडू पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर तुटून पडले. इंग्लंडने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून १-० ने आघाडी घेतली आहे. सध्या पाकिस्तानइंग्लंड दौऱ्यावर असून, तिथे चार सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाला, तर दुसरा सामना जिंकून यजमान इंग्लिश संघाने आघाडी घेतली. माजी खेळाडू कामरान अकमलने कर्णधार बाबर आझमवर गंभीर आरोप करताना बाबर केवळ जवळच्या सहकाऱ्यांना संधी देत असल्याचे म्हटले आहे.

कामरान अकमल म्हणाला की, पाकिस्तानी संघात खेळाडूंची होत असलेली निवड ही नियमबाह्य आहे. कोणालाही संघात स्थान मिळत आहे. 'यारी दोस्ती' यामुळे पाकिस्तानचा सातत्याने पराभव होत आहे. हा एक विनोदच झाला आहे. जवळच्या सहकाऱ्यांनाच संधी दिली जात आहे, हे सगळं थांबवून खेळाडूंची निवड त्यांच्या क्षमतेनुसार केली पाहिजे. जो चांगला खेळतो, ज्याच्यात टॅलेंट आहे त्याला न वगळता प्राधान्य द्यायला हवे. अबरार अहमदला संधी दिली जात नाही. हे खरंच दुर्दैव असून मी याचा निषेध करतो. अकमल त्याच्या युट्यूब चॅनेलवर बोलत होता. 

पाकिस्तानचा पराभव, इंग्लंडची आघाडी
दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मग आव्हानाचा पाठलाग करताना पाहुण्या पाकिस्तानला घाम फुटला अन् २३ धावांनी पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने निर्धारित २० षटकांत ७ बाद १८३ धावा केल्या. कर्णधार जोस बटलरने सर्वाधिक धावा करताना ५१ चेंडूत ८४ धावा कुटल्या. त्याने ३ षटकार आणि ८ चौकार लगावले. त्याच्याशिवाय विल जॅक्सने ३७ धावांची खेळी केली. इंग्लंडने दिलेल्या १८४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला नेहमीप्रमाणे संथ खेळीचा फटका बसला. कर्णधार बाबर आझमने २६ चेंडूत ३२ धावा केल्या, मग फखर झमानने २१ चेंडूत ४५ धावा करून सामन्यात रंगत आणली. पण, इंग्लंडच्या घातक गोलंदाजीसमोर पाकिस्तान निर्धारित २० षटके देखील खेळू शकला नाही. अखेर पाहुण्या संघाने १९.२ षटकांत सर्वबाद केवळ १६० धावा केल्या आणि सामना २३ धावांनी गमावला. 

Web Title:  ENG vs PAK 2nd T20 Pakistan former cricketer Kamran Akmal said, Players are getting selected in Pakistan's team on yaari dosti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.