मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
पश्चिम द्रुतगती मार्ग ओबेरॉय मॉल येथील जंक्शन व इतर जंक्शन जवळील काम आद्यवत अशा मास्टिक पद्धतीने केले जाणार असून उर्वरित रस्ता सिमेंट काँक्रीटचा केला जाणार आहे. ...
देखभाल-दुरुस्तीसाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या ७ फेब्रुवारी ते ३० मार्चदरम्यान मंगळवार, गुरुवार व शनिवारी असे तीन दिवस ६ तासांसाठी बंद ठेवण्यात येतील. ...
शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना ज्या तरतुदीअंतर्गत फाशीची शिक्षा ठोठाविण्यात आली त्या तरतुदीच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी २० फेब्रुवारीपासून सुरू करू, असे उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले. ...
सर जे.जे. समूह रुग्णालयाच्या अधिपत्याखाली होणारे जे.जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे काम दोन महिन्यांत सुरू होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित असणाऱ्या या प्रकल्पाला मंगळवारी राज्य शासनाने हिरवा कंदील दिला आहे. ...
राज्यात महसूल, पोलीस व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा गेल्या दहा दिवसांपासून घोळ सुरू असून महसूलच्या वादात बदल्यांचे घोडे अडले असल्याचे समजते. ...
मोडकळीस आलेल्या पुलांच्या दुरूस्तीबरोबरचे मुंबईत काही नवीन पूल उभे करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे मुंबईची कोंडी फुटून वाहतुकीला वेग मिळणार आहे. ...
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे हाती घेण्यात आलेल्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ चे भूगर्भात सुरु असलेले काम मुंबईकरांसाठी दिवसागणिक कुतूहलाचा विषय ठरत आहे. ...