Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे. Read More
Ajit Pawar Oath News Update: अजित पवारांसोबत ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर काहीही न बोलता राष्ट्रवादीचे नेते राजभवनातून निघून गेले आहेत. अजित पवारांनी ट्विटवरवरील बायो देखील बदलला आहे. ...
राज्याच्या राजकारणातील या धक्कातंत्रामुळे नेमकं काय चाललंय, असा प्रश्न जनतेला पडला आहे. तर, शरद पवारांचा आजच्या शपथविधीला पाठिंबा नसल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आल्याचे समजते. ...