Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे. Read More
Sanjay Raut on CJI Surya kant and Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या स्वागताचे फोटो पोस्ट केले. याच फोटोवरून खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. ...
Ulhas Bapat on Shiv Sena Supreme Court Hearing: घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी शिवसेना सत्तासंघर्षावर मोठे भाष्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा विलंब आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयातील त्रुटींवर त्यांनी बोट ठेवले आहे. ...
Shivsena Dhanushyaban Election Symbol Case: शिवसेना फुटली त्याला आता चार वर्षे झाली आहेत. जून २०२२ मध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेत मोठे वादळ घोंघावले होते. यात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदेंकडे गेले होते. ...