सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी परिसरातील सितेपार, शिकारीटोला, कोसमतोंडी परिसरातील मालीजुंगा, धानोरी बिट क्रमांक २ मधील उत्तर दिशेला रस्त्यापासून ४०० मीटरवर पहाडीला लागून राखीव जंगल आहे. ...
राजीवनगर झोपडपट्टीलगत महापालिकेने तयार केलेल्या शंभरफुटी रस्त्याच्या दुतर्फा तयार करण्यात आलेल्या फुटपाथवर पुन्हा एकदा अतिक्रमण करण्यात आले असून, पादचाऱ्यांना फुटपाथ शोधण्याची वेळ आली आहे. ...
बीड - जामखेड - नगर राज्य महामार्गावर अनेक वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर लोकांनी अतिक्रमणे केली आहेत. यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असून अरुंद रस्ते झाल्याने अपघात वाढले आहेत. ही अतिक्रमणे हटविण्यात य ...
कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने शनिवारी पोलीस बंदोबस्तात स्थानिक बजाज चौक भागातील भाजी बाजारातील अतिक्रमण काढण्यात आले. आज राबविलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान अतिक्रमणामुळे अरुंद झालेला रस्ता मोकळा करण्यात आला. ...
शहरातील महसूल विभागाच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात खाजगी व्यक्तींनी अतिक्रमण केले असताना ही अतिक्रमणे हटविण्याकडे या विभागाच्या अधिकाºयांना वेळ मिळत नसल्याने शासकीय जमिनी धोक्यात आल्या आहेत़ ...
शहरालगतच्या कक्ष क्रमांक १७० मध्ये काही नागरिकांनी चुना, कापडी रिबीन बांधून अतिक्रमण करून जागेची आखणी केली. या बाबीची माहिती मिळताच बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी धडक मोहिम राबवून अतिक्रमीत क्षेत्र नेस्तनाबूत केले आहे. ...
शहारच्या जयस्तंभ चौकात तहसील कार्यालयाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीसमोरील अतिक्रमण हटवितांना दुकानदारांनी तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांसोबत धक्काबुक्की केली. ही घटना बुधवारी (दि.३) दुपारी जयस्तंभ चौक परिसरात घडली. ...