कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी

१८ वर्षीय साहिल पारख भारतीय क्रिकेटमधील प्रतिभावंत क्रिकेटरपैकी एक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 19:30 IST2026-04-27T19:26:18+5:302026-04-27T19:30:36+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 DC vs RR Who is Sahil Parakh DC youngster making IPL Debut against RCB Originally From the town of Nashik in Maharashtra | कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी

कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवरील रॉयल चॅलेंजर्स विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने नाशिकच्या साहिर पारख याला IPL पदार्पणाची संधी दिली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने नाणेफेक जिंकल्यावर पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. रजत पाटीदारनं सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरण्याचे स्पष्ट केल्यावर अक्षर पटेलनं सलामीवीराच्या रुपात मराठमोळा साहिल पारखला संधी देण्यात आल्याची सांगितले. याशिवाय कायले जेमिसन आणि दुश्मंत चमीराला दिल्ली कॅपिटल्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. इथं जाणून घेऊयात कोण आहे साहिल पारख? कसा आहे त्याचा इथपर्यंतचा प्रवास यासंदर्भातील सविस्तर

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

नाशिककराला वयाच्या १८ व्या वर्षी मिळाली IPL पदार्पणाची संधी

१८ वर्षीय साहिल पारख भारतीय क्रिकेटमधील प्रतिभावंत क्रिकेटरपैकी एक आहे. डावखुऱ्या हाताने आक्रमक खेळी करण्याची क्षणता असणारा साहिललेग स्पिनर गोलंदाजीही करू शकतो. २०२४-२५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या भारत अंडर-१९ मालिकेदरम्यान साहिलच्या राष्ट्रीय स्तरावरील कारकिर्दीला वेग आला, जिथे त्याने केवळ ७५ चेंडूंमध्ये १०९ धावांची चित्तथरारक खेळी केली.

सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण

दिल्ली कॅपिटल्सनं किती रुपये मोजले?

दिल्ली कॅपिटल्सच्या संघात सामील होण्यापूर्वी  त्याने महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये ईगल टायटन्स नाशिकचे प्रतिनिधित्व केले आहे. दिल्ली फ्रँचायझी संघाने मिनी लिलावात ३० लाख रुपयांसह त्याला आपल्या ताफ्यात घेतलं होतं. श्रीलंकन सलामीवीर निसंकाच्या जागी त्याला DC नं पदार्पणाची संधी दिली. 

पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

दिल्ली कॅपिटल्सच्या डावाची सुरुवात करताना युवा बॅटर अनुभी भुवीसमोर सपशेल अपयशी ठरला. RCB च्या ताफ्यातील प्रमुख गोलंदाज असलेल्या भुवीनं अप्रतिम इनस्विंगवर त्याला चकवा दिला. पदार्पणाच्या सामन्यात दुसऱ्या चेंडूवर खातेही न उघडता तो माघारी फिरला.  

Web Title : नाशिक के साहिल पारख ने दिल्ली कैपिटल्स के लिए आईपीएल में पदार्पण किया।

Web Summary : नाशिक के 18 वर्षीय साहिल पारख ने रॉयल चैलेंजर्स के खिलाफ दिल्ली कैपिटल्स के लिए आईपीएल में पदार्पण किया। बाएं हाथ के बल्लेबाज और लेग स्पिनर पारख ने ऑस्ट्रेलिया के खिलाफ अंडर-19 श्रृंखला में शानदार शतक के साथ प्रसिद्धि प्राप्त की। उन्होंने पहले ईगल टाइटन्स नाशिक के लिए खेला था।

Web Title : Nashik's Sahil Parakh debuts in IPL for Delhi Capitals.

Web Summary : Sahil Parakh, an 18-year-old from Nashik, made his IPL debut for Delhi Capitals against Royal Challengers. A left-handed batsman and leg-spinner, Parakh gained prominence in the Under-19 series against Australia with a stunning century. He previously played for Eagle Titans Nashik.