परभणी : सरपंच, सदस्य अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 11:09 PM2018-10-10T23:09:30+5:302018-10-10T23:10:11+5:30

येलदरी वसाहतीमध्ये अतिक्रमण करणाऱ्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व अपात्र करण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी दिला आहे.

Parbhani: Sarpanch, member ineligible | परभणी : सरपंच, सदस्य अपात्र

परभणी : सरपंच, सदस्य अपात्र

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: येलदरी वसाहतीमध्ये अतिक्रमण करणाऱ्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व अपात्र करण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी दिला आहे.
याबाबत अ‍ॅड.जितेंद्र घुगे यांनी दिलेली माहिती अशी- जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हाळसा, येलदरी, हिवरखेडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच कौशल्या हरि आडणे व सदस्य शीला रमेश कंठाळे यांनी येलदरी वसाहतीत अतिक्रमण केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी करणारी याचिका अनिता माने यांनी अ‍ॅड.जितेंद्र घुगे यांच्यामार्फत जिल्हाधिकाºयांच्या दालनात दाखल केली होती. सरपंच व ग्रामपंचायत सदस्याने येलदरी वसाहत येथे शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले असून तहसीलदारांच्या अतिक्रमणधारकांच्या यादीत त्यांची नावे आहेत. त्यामुळे सरपंच व ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व अपात्र करण्याची मागणी केली. पडताळणीनुसार जिल्हाधिकाºयांनी वरील प्रमाणे आदेश दिला.
राजीव चव्हाण यांचे सरपंचपद रद्द
जिंतूर : तालुक्यातील कवडा येथील सरपंच राजीव ऊर्फ राजेश सखाराम चव्हाण यांना तिसरे अपत्य असल्याने जिल्हाधिकाºयांनी त्यांचे सरपंचपद रद्द केले आहे. राकॉंचे गजानन चव्हाण यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती. सुनावणीअंती जिल्हाधिकाºयांनी हा आदेश दिला. गजानन चव्हाण यांच्या बाजुने अ‍ॅड. आर.पी. सराफ यांनी काम पाहिले.

Web Title: Parbhani: Sarpanch, member ineligible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.