देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड येथील मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोमवारी (दि१७) होणार असून या शपथविधीसाठी खासदार राजू शेटटी यांना काँग्रेसकडून निमंत्रित करण्यात आले आहे. ...
९० दिवसांत आरोपपत्र दाखल केले नाही या कारणासाठी आरोपींना मिळालेला जामीन हा सरकारमध्ये बसलेल्या सनातनी साधकांचे चेहरे उघड करणारा असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. ...
राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड ही तीन राज्ये जिंकल्यानंतर त्यांच्या मुख्यमंत्रिपदावर कोण येईल, याची चर्चा सुरू झाली असली तरी काँग्रेस पक्षात त्याचे वादंग नाही ही बाब सुखावह आहे. ...