देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
मालेगाव शहरात वीज वितरणासाठी शासनाकडून खासगी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ मालेगाव शहर कॉँग्रेस कमिटीच्या वतीने आज शुक्रवारी दुपारी अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा नेण्यात आला. ...
आम्ही याच खोलीत बसलो होतो. कोणाला माहीत होते की, आम्ही दोघेही करोडपती होऊ, असे सांगत सचिन पायलट यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि राज्यातील जनतेचे आभार मानले. सचिन पायलट यांची राजस्थानच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आल्यानंतर ते बोलत होते. ...
राजस्थानचे नवे मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, याबाबतचा तिढा सुटला आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी अशोक गहलोतच पुन्हा एकदा विराजमान होणार आहेत. तर उपमुख्यमंत्रीपदी सचिन पायलट यांची निवड करण्यात आली आहे. ...
पाचपैकी तीन राज्यांतील निवडणुकांत काँग्रेसने मिळविलेल्या यशानंतर सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते चार्ज झाले असले तरी, सोबतीला गटबाजीही तितक्याच उत्साहाने रिचार्ज होताना दिसत आहे. वाढती गटबाजी, समन्वयाचा अभाव आणि नेतृत्वहीन झालेल्या सा ...
पक्षाचा विजय हा सांघिक असल्याचे काँग्रेसचे नेते सांगत असले तरी निवडणुकांच्या सामन्याचे खरे मॅन ऑफ द मॅच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हेच ठरले. ...