कोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री?, उद्या फैसला...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 08:05 PM2018-12-15T20:05:55+5:302018-12-15T20:06:54+5:30

छत्तीसगडमधील मुख्यमंत्री पदासाठी टी. एस. सिंह देव, ताम्रध्वज साहू, भूपेश बघेल आणि चरणदास महंत यांची नावे सध्या जोरदार चर्चेत आहेत.

Who will be Chhattisgarh Chief Minister, tomorrow's decision ... | कोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री?, उद्या फैसला...

कोण होणार छत्तीसगडचा मुख्यमंत्री?, उद्या फैसला...

नवी दिल्ली : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील मुख्यमंत्रीपदाची घोषणा काँग्रेसकडून केल्यानंतर छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

छत्तीसगडमधील मुख्यमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटला नसून यासंदर्भात उद्या निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटवरवरुन छत्तीसगडमधील मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेल्या टी. एस. सिंह देव, ताम्रध्वज साहू, भूपेश बघेल आणि चरणदास महंत या चार दिग्गज नेत्यांसोबत आपला फोटो शेअर केला आहे. त्यामुळे असे लक्षात येते की, या चारपैकी कोणीतरी एकजण राज्याचा पुढील मुख्यमंत्री असणार आहे. 




दिल्लीत शनिवारी राहुल गांधी यांच्यासोबत टी. एस. सिंह देव, ताम्रध्वज साहू, भूपेश बघेल आणि चरणदास महंत यांची बैठक झाली. यावेळी बैठकीला पक्षाचे केंद्रीय पर्यवेक्षक मल्लिकार्जुन खर्गे, छत्तीसगड प्रभारी पुनिया उपस्थित होते. छत्तीसगडमधील मुख्यमंत्री पदासाठी टी. एस. सिंह देव, ताम्रध्वज साहू, भूपेश बघेल आणि चरणदास महंत यांची नावे सध्या जोरदार चर्चेत आहेत.

दरम्यान, रायपूरमध्ये रविवारी दुपारी 12 वाजता काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्रिपदाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येईल, अशी माहिती काँग्रेस नेते पी. एल. पुनिया यांनी दिली आहे.  

Web Title: Who will be Chhattisgarh Chief Minister, tomorrow's decision ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.