देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
भाजप सरकार लोकशाहीविरोधी असून, या देशाला वाचविण्यासाठी त्यांचे वाईट मनसुबे उधळून लावण्याची वेळ आली आहे, असे मत ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या महासचिव कॉ. अमरजित कौर यांनी व्यक्त केले. ...
Rafale Deal : राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणावरुन काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी आता भाजपा नेते आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर निशाणा साधला आहे. ...
Rafale Deal : राफेल डीलसंदर्भात काँग्रेसकडून जारी करण्यात आलेल्या 'ऑडिओ बॉम्ब'वरुन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शाब्दिक हल्ला चढवला आहे. ...
Rafale Deal : राफेल डील प्रकरणाला काँग्रेसनं आता नवीन वळण दिले आहे. गोव्यातील आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची कथित ऑडिओ क्लिप प्रसिद्ध करुन काँग्रेसनं राफेल विमान खरेदी करारावरुन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर निशाणा साधला आहे. ...
Rafale Deal : राफेल विमान करारवरुन काँग्रेसनं भाजपावर आता 'ऑडिओ बॉम्ब' टाकला आहे. राफेल डीलसंदर्भात काँग्रेसकडून गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची कथित ऑडिओ क्लिप जारी करण्यात आली आहे. ...
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या बालेकिल्ल्यांमध्ये काँग्रेसने भाजपाला हादरा दिला. तिन्ही राज्यांमधील सत्ता भाजपाला गमवावी लागली. या पराभवावर ... ...