देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी काँग्रेसचा कोणताही प्रस्ताव आतापर्यंत आला नाही़ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्याशी चर्चा झाली असली तरीही अधिकृत प्रस्ताव अद्याप आला नाही़ त्याचवेळी अजूनही चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले़ ...
भाजपाने देशात मुस्लिमांना वंचित केले आहे तर काँग्रेस ओबीसींना वंचित करु पाहत आहे, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. ...
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. नवी दिल्लीतील एम्समध्ये त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत. दरम्यान, अमित शहांना झालेल्या आजारावर टीका करताना काँग्रेसचे खासदार बी. के हरिप्रसाद यांनी वादग्रस्त विधान केले. ...
जामोद येथील ग्रामीण रुग्णालयामधील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह परिचारिका तथा इतर रिक्त पदे भरण्यासाठी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी सकाळपासून रुग्णालयाच्या इमारतीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात येत आहे. ...
Karnatak Politics : कर्नाटकमधील राजकीय नाट्यमय घडामोडींदरम्यान जेडीएस-काँग्रेस आघाडी आणि भारतीय जनता पार्टी एकमेकांवर आमदार फोडण्याचा आरोप करत आहेत. यादरम्यान जेडीएसचे आमदार केएम शिवलिंगे गौडा यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. ...