देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी मंत्रिपदाचा गैरवापर करून नियमांची पायमल्ली करणा-या रेशन दुकानदारांना अभय देत आहेत. असा ठपका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ठेवला आहे. ...
भाजपाच्या विरोधात राट्रीय स्तरावर महायुती साकारण्याच्या स्वप्नास नख लावणाऱ्या ठरल्या आहेत. त्यामुळे भाजपाच्या गोटात खुशीचे वातावरण दिसत असले तरी, सखोल विचार केल्यास, त्यामुळे भाजपाला निवडणुकीत फार लाभ होईल असे वाटत नाही. ...
अकोला: भारिप-बमसंचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येत्या लोकसभा निवडणुकीसाठी आपले पत्ते खुले केले आहेत. भारिप-बमसं ‘एमआयएम’सोबतच निवडणूक लढविणार असून, वंचित बहुजन समाजातील १२ समाजांना प्रतिनिधित्व देण्यासाठी त्यांनी उमेदवार निश्चितीचेही ...