देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांनी संविधानाचा खून केल्याच्या टीकेला वंचित बहुजन आघाडीचे उत्तर ...
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करून मिशन शक्तीमधील शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. यावेळी राहुल यांनी मोदींना जागतीक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देत टोला लगावला. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित असणारा चित्रपट पीएम नरेंद्र मोदी यावर दिवसेंदिवस वाद वाढत चाललेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने या चित्रपटाच्या निर्मात्यांना नोटीस पाठवली आहे ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी येथून लढणार याची भाजपाकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतर आता विरोधी पक्षांनी त्यांना घेरण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. ...