देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर केलेले आरोप राजकीय द्वेषापोटी केलेले आहेत. त्यांच्या या विधानाचा पुणे शहर काँग्रेसने पत्रक काढून निषेध केला. ...
तीन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलने घातक ठरू शकते. त्यामुळे अशोक चव्हाणच प्रदेशाध्यक्षपदी राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ...
पवारांनी गेली ४० वर्षे महाराष्ट्रावर राज्य केले. सत्तेवर असताना आणि नसतानाही. त्यांची राजकारणातली व्यक्तिगत पत अजून तेवढीच व तशीच आहे. मात्र त्यांच्या दुर्दैवाने देशाच्या राजकारणानेच आता नवे वळण घेतले आहे. ...