IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर

Khaleel Ahmed Ruled Out: आयपीएल २०२६ मध्ये सलग सामने जिंकल्यानंतर, चेन्नई सुपर किंग्सला एक मोठा धक्का बसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 14:13 IST2026-04-16T14:09:37+5:302026-04-16T14:13:15+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Khaleel Ahmed: Thirteenth month in drought! Chennai Super Kings' star bowler out of IPL 2026 | IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर

IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर

आयपीएल २०२६ मध्ये सलग दोन सामने जिंकून पुनरागमन करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सला एक मोठा धक्का बसला आहे. संघाचा वेगवान गोलंदाज खलील अहमद दुखापतीमुळे आयपीएल २०२६ मधून बाहेर झाला. चेन्नई सुपर किंग्ससाठी या हंगामाची सुरुवात अत्यंत खडतर ठरली. स्पर्धेच्या सुरुवातीच्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला.  त्यानंतर पुढील दोन सामन्यात विजय मिळवून लय गवसलेली असतानाच खलील अहमद स्पर्धेतून बाहेर झाला आहे. खलीलची उणीव भरून काढण्यासाठी चेन्नईला आता योग्य पर्यायाची निवड करणे गरजे आहे, अन्यथा पुन्हा एकदा गोलंदाजीची बाजू कमकुवत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

१४ एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान, खलीलने आपल्या उजव्या कमरेत वेदना होत असल्याची तक्रार केली. खलीलची वैद्यकीत तपासणी केली असता त्याची दुखापत गंभीर असल्याचे निदान झाले. या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला किमान १० ते १२ आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला. दरम्यान, खलील अहमदच्या जागी कोणत्या खेळाडूला संघात स्थान मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

चेन्नई सुपरकिंग्जचे दमदार कमबॅक

चेन्नई सुपर किंग्सने आपल्या आयपीएल २०२६ मोहिमेची सुरुवात सलग तीन पराभवांनी केली. मात्र, आपल्या मागील दोन सामन्यांमध्ये त्यांनी दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला. आयपीएलच्या गुणतालिकेत चेन्नईचा संघ (४ गुण) आठव्या स्थानावर आहे. त्यांचा पुढील सामना १८ एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे.सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे, तर राजस्थान रॉयल्स दुसऱ्या स्थानावर आहे.

Web Title : खलील अहमद आईपीएल 2026 से बाहर: चेन्नई सुपर किंग्स को झटका

Web Summary : चेन्नई सुपर किंग्स को बड़ा झटका लगा है क्योंकि खलील अहमद चोट के कारण आईपीएल 2026 से बाहर हो गए हैं। शुरुआती हार के बाद, सीएसके ने दो मैच जीते थे। खलील की चोट उनके गेंदबाजी आक्रमण को कमजोर करती है। टीम सनराइजर्स हैदराबाद के खिलाफ अपने अगले मैच से पहले गेंदबाज की तलाश कर रही है।

Web Title : Khaleel Ahmed Out of IPL 2026: Chennai Super Kings Suffers Blow

Web Summary : Chennai Super Kings face setback as Khaleel Ahmed is ruled out of IPL 2026 due to injury. After initial losses, CSK had won two games. Khaleel's injury weakens their bowling attack. The team is seeking a replacement for the bowler before their next match against Sunrisers Hyderabad.