महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 15:35 IST2026-04-16T15:32:34+5:302026-04-16T15:35:07+5:30

Uddhav Thackeray News: संजय राऊत यांनी एक्सवर एक पोस्ट करत उद्धव ठाकरे यांची याबाबत काय भूमिका आहे, ते सांगितले.

uddhav thackeray first reaction on the women reservation bill and clarifying party stand | महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”

महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”

Uddhav Thackeray News: संसदेचे विशेष अधिवेशन सुरू झाले आहे. महिला आरक्षण आणि मतदारसंघांच्या पुनर्रचनेशी संबंधित तीन महत्त्वाची विधेयके ससंदेत मांडण्यात आली. या विधेयकाच्या प्रस्ताव सादर करण्याच्या बाजूने २५१ जणांनी मतदान केले. तर १८५ सदस्यांनी याला विरोध दर्शवला. यानंतर, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जनगणना आणि महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. यातच उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेच्या विधेयकांवर प्रतिक्रिया देताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली. 

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक्सवर एक पोस्ट करत उद्धव ठाकरे यांची याबाबत काय भूमिका आहे, ते सांगितले. महिला आरक्षण विधेयकावर सध्या राजकीय गदारोळ सुरू आहे. शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. २०२३ साली महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर झाले आहेच, त्यानुसार ३३ टक्के महिला आरक्षण तत्काळ लागू करा!, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

अधिक चर्चा आणि संशोधन होणे आवश्यक आहे!

तसेच मतदार संघ पुनर्रचना म्हणजे delimition या विषयाला तूर्त ब्रेक लागला पाहिजे, हा एक व्यापक व राष्ट्रीय एकात्मेसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे, आमच्यासाठी हा एकाद्या पक्षाच्या राजकीय भविष्याचा विषय नसून देशाच्या भविष्याचा विषय आहे.म्हणूनच त्यावर अधिक चर्चा आणि संशोधन होणे आवश्यक आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले  आहे. 

दरम्यान, लोकसभेत समाजवादी पक्षाचे खासदार धर्मेंद्र यादव यांनी संविधान (१३१ वी दुरुस्ती) विधेयक २०२६ आणि मतदारसंघ पुनररचना (परिसीमन) विधेयक - २०२६ ला तीव्र विरोध केला. महिला आरक्षणामध्ये मागास महिलांसाठी स्वतंत्र कोटा असावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तसेच, महिला आरक्षण हे जनगणना आणि मतदारसंघ पुनररचना विधेयकापासून वेगळे करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांवरही त्यांनी आक्षेप घेतला. दरम्यान, "आम्ही महिला आरक्षणाचे समर्थक आहोत, पण सरकार अद्याप जनगणना का करत नाही?" असा सवाल अखिलेश यादव यांनी सरकारला केला.

Web Title : महिला आरक्षण विधेयक पर उद्धव ठाकरे की पहली प्रतिक्रिया: 'तत्काल...'

Web Summary : उद्धव ठाकरे ने संसदीय अनुमोदन के बाद 33% महिला आरक्षण को तत्काल लागू करने का आग्रह किया। उन्होंने निर्वाचन क्षेत्र पुनर्गठन पर गहन विचार-विमर्श की वकालत की, इसे मात्र राजनीतिक लाभ से परे, राष्ट्रीय एकता के लिए महत्वपूर्ण माना।

Web Title : Uddhav Thackeray's first reaction to women's reservation bill: 'Immediately...'

Web Summary : Uddhav Thackeray urges immediate implementation of 33% women's reservation following parliamentary approval. He advocates for thorough deliberation on constituency restructuring, viewing it as vital for national unity, beyond mere political gain.