Khaleel Ahmed Replacement : IPL 2026 स्पर्धेत अडखळत सुरुवात करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने सलग दोन विजयासह कमबॅकसाठी शड्डू ठोकला असताना संघातील स्टार गोलंदाज उर्वरित स्पर्धेतून बाहेर पडला आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यातील विकेट टेकर गोलंदाज खलील अहमद दुखापतीमुळे उर्वरित स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याची उणीव भरून काढण्यासाठी योग्य खेळाडूला संघात खेळवण्याचे आव्हान चेन्नई सुपर किंग्स संघ व्यवस्थापन आणि ऋतुराज गायकावडसमोर असेल. इथं जाणून घेऊयात खलील अहमद जागी चेन्नई सुपर किंग्ससाठी कोण ठरू शकते सर्वोत्तम पर्याय त्यासंदर्भातील सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुकेश चौधरी (Mukesh Choudhary)
देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्र संघाकडून खेळणाऱ्या २९ वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी हा ऋतुराजची डोकेदुखी कमी करू शकतो. याआधीही CSK कडून खेळला आहे. IPL २०२२ मध्ये त्याने १३ सामन्यांत १६ विकेट घेतल्या होत्या आणि त्या हंगामात तो CSK चा एक प्रमुख गोलंदाज होता. मात्र त्यानंतरच्या तीन वर्षांत त्याला फक्त तीनच सामने खेळण्याची संधी मिळाली. गत हंगामात त्याला फक्त २ सामन्यात संधी मिळाली होती. यावेळी त्याला फक्त १ विकेट मिळाली होती. तो मूळचा राजस्थानमधील भिलवाडाचा असला तरी महाराष्ट्र संघाकडून त्याने खास छाप सोडली आहे.
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
रामकृष्ण घोष (Ramakrishna Ghosh)
रामकृष्ण घोष हा आणखी एक सर्वोत्तम पर्याय CSK च्या संघाकडे आहे. नाशिकच्या २८ वर्षीय गोलंदाजामध्ये १४० किमी प्रती तास वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ च्या हंगामात त्याने महाराष्ट्र संघाकडून खेळताना ७ सामन्यांत १७ विकेट घेतल्या आहेत. हिमाचल प्रदेशविरुद्ध त्याने ४२ धावांत ७ विकेट्सचा डाव साधला होता.
जॅकरी फॉल्क्स (Zakary Foulkes)
न्यूझीलंडचा २३ वर्षीय वेगवान गोलंदाज जॅकरी फॉल्क्स हा देखील खलील अहमदचा रिप्लेसमेंट ठरू शकतो. त्याने ६८ टी२० सामन्यांत ७७ विकेट्ल घेतल्या आहेत. पॉवरप्लेसह डेथ ओव्हर्समध्ये विकेट घेण्याची क्षमता असणाऱ्या या गोलंदाजाने न्यूझीलंडच्या संघाकडून २२ टी२० सामन्यांत २२ विकेट्स घेतल्या आहेत.