युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 19:49 IST2026-04-16T19:48:34+5:302026-04-16T19:49:01+5:30

युट्यूबवरून कमाई कशी करायची? ५ लाख व्ह्यूज मिळाल्यावर किती रुपये मिळतात आणि युट्यूब पार्टनर प्रोग्रामच्या अटी काय आहेत? वाचा..

How much money will be deposited in your bank account if you get 5 lakh views on YouTube? Know the exact math of earning | युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित

युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित

आजच्या काळात सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे साधन उरले नसून, ते कमाईचे एक मोठे व्यासपीठ बनले आहे. विशेषतः युट्यूबवर व्हिडिओ बनवून अनेक तरुण महिन्याला लाखो रुपये कमवत आहेत. पण, अनेकांच्या मनात एकच प्रश्न असतो की, नक्की किती व्ह्यूज मिळाल्यावर किती पैसे मिळतात? जर तुमच्या एखाद्या व्हिडिओला ५ लाख व्ह्यूज मिळाले, तर तुमच्या खिशात किती रक्कम येईल? याचे रंजक गणित आज आपण समजून घेणार आहोत.

आधी 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील

युट्यूबवरून पैसे कमवण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी 'युट्यूब पार्टनर प्रोग्राम'मध्ये सामील व्हावे लागते. यासाठी तुमच्या चॅनेलवर किमान १,००० सब्सक्राइबर्स आणि ४,००० तासांचा वॉच टाइम पूर्ण असणे अनिवार्य आहे. या अटी पूर्ण झाल्यानंतरच तुमचे व्हिडिओ मॉनेटाइज होतात आणि त्यावर जाहिराती सुरू होतात.

५ लाख व्ह्यूजवर किती मिळणार पैसे?

युट्यूबवर कमाईचे कोणतेही एक निश्चित सूत्र नाही, कारण ते व्हिडिओची कॅटेगरी, प्रेक्षक कोणत्या देशातील आहेत आणि जाहिराती कशा आहेत, यावर अवलंबून असते. तरीही एका ढोबळ अंदाजानुसार, भारतात सध्या १,००० व्ह्यूजवर ५० ते २०० रुपयांपर्यंत कमाई होते. या हिशोबाने पाहिल्यास, जर तुमच्या व्हिडिओला ५ लाख व्ह्यूज मिळाले, तर तुम्ही ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत सहज कमाई करू शकता.

कमाईची विभागणी कशी होते?

युट्यूबला जाहिरातदारांकडून जो पैसा मिळतो, त्यातील ५५ टक्के हिस्सा तो क्रिएटर्सना देतो आणि उरलेला ४५ टक्के हिस्सा कंपनी स्वतःकडे ठेवते. जर तुमचे प्रेक्षक अमेरिका किंवा युरोपसारख्या देशांतील असतील, तर ही कमाई अजूनही जास्त असू शकते.

कमाई वाढवण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा:

ट्रेंडिंग विषयांची निवड: नेहमी लोक काय शोधत आहेत, त्या विषयावर व्हिडिओ बनवा.

व्हिडिओ क्वालिटी: तुमचा व्हिडिओ पाहताना प्रेक्षकांना तो आवडला पाहिजे, तरच वॉच टाइम वाढतो.

इतर मार्ग: केवळ जाहिरातींवर अवलंबून न राहता तुम्ही एफिलिएट मार्केटिंग, स्पॉन्सरशिप, सुपर चॅट आणि चॅनेल मेंबरशिपद्वारेही बक्कळ पैसा कमवू शकता.

Web Title : यूट्यूब व्यूज से कमाई: 5 लाख व्यूज पर कितनी होगी आय, जानिए

Web Summary : यूट्यूब कमाई का जरिया है। 1,000 सब्सक्राइबर और 4,000 घंटे पूरे होने पर वीडियो मॉनेटाइज करें। 5 लाख व्यूज पर ₹50,000-₹1 लाख तक कमा सकते हैं, जो विषय और दर्शकों पर निर्भर है। ट्रेंडिंग टॉपिक, अच्छी क्वालिटी, एफिलिएट मार्केटिंग से कमाई बढ़ाएँ।

Web Title : YouTube Views to Income: Calculate Earnings from 5 Lakh Views

Web Summary : YouTube offers earning potential. Monetize videos after reaching 1,000 subscribers and 4,000 watch hours. 5 lakh views can earn ₹50,000-₹1 lakh, influenced by content category and audience location. Diversify income through trending topics, quality content, affiliate marketing and sponsorships.