कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी

मयांक रावत याला मुंबई इंडियन्सच्या संघाने दिली पदार्पणाची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 19:39 IST2026-04-16T19:35:30+5:302026-04-16T19:39:52+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Who Is Mayank Rawat Delhi All-Rounder Makes Mumbai Indians Debut In IPL 2026 Against Punjab Kings | कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी

कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी

मुंबईतील वानखेडेच्या मैदानातील पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ रोहित शर्माशिवाय मैदानात उतरला आहे. सलामीवीराच्या रुपात हिटमॅनच्या जागी क्विंटन डीकॉकला संधी देण्यात आली. याशिवाय MI च्या संघात आणखी एक मोठा बदल करण्यात आला. मिचेल सँटनरच्या जागी युवा भारतीय अनकॅप्ड मयांक रावत याला मुंबई इंडियन्सच्या संघाने पदार्पणाची संधी दिली आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

कोण आहे मयांक रावत? एका ओव्हरमध्ये स्टार झालेल्या हिरोला MI नं दिली संधी

Who Is Mayank Rawat Delhi All-Rounder Makes Mumbai Indians Debut  : दिल्लीमध्ये जन्मलेला मयांक रावत हा  हा उजव्या हाताने फलंदाजी करणारा खेळाडू असून तो उजव्या हाताने ऑफ-स्पिन गोलंदाजीही करू शकतो. तो १९ वर्षांखालील भारतीय संघाचाही भाग राहिला आहे.  ऑलराउंड क्षमतेमुळे तो संघासाठी फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये उपयुक्त ठरू शकतो. दिल्लीच्या या युवा पठ्ठ्यानं दिल्ली प्रिमियर लीगमध्ये एका षटकात पाच षटकार मारून मैफील लुटली होती. याच स्पर्धेतून तो प्रकाश झोतात आला. 

Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?

एका षटकात ५ षटकार,  मग MI नं खेळला ३० लाखांचा डाव

२०२४-२५ च्या हंगामात  मयांक रावत हा दिल्लीच्या संघाकडून रणजी ट्राफी स्पर्धेतही खेळला आहे. पण लोकल दिल्ली प्रिमियर लीग स्पर्धेतील कामगिरीमुळे तो प्रकाश झोतात आला.  ईस्ट दिल्ली रायडर्सच्या संघाकडून खेळताना त्याने  साउथ दिल्ली सुपरस्टार्सचा कर्णधार आणि IPL मधील लोकप्रिय चेहरा आयुष बडोनीच्या एका षटकात ५ षटकार मारले होते.  मिनी लिलावात मुंबई इंडियन्सच्या संघाने या खेळाडूला ३० लाख या मूळ किंमतीसह आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. 

 

Web Title : मयंक रावत ने पांच छक्के लगाने के बाद मुंबई इंडियंस में किया डेब्यू

Web Summary : दिल्ली प्रीमियर लीग में एक ओवर में पांच छक्के लगाने के लिए जाने जाने वाले मयंक रावत ने पंजाब किंग्स के खिलाफ मुंबई इंडियंस के लिए डेब्यू किया। मिनी नीलामी में खरीदे जाने के बाद ऑलराउंडर ने लाइनअप में मिचेल सेंटनर की जगह ली।

Web Title : Mayank Rawat Debuts for Mumbai Indians After Five-Sixes Feat

Web Summary : Mayank Rawat, known for hitting five sixes in an over in the Delhi Premier League, debuted for Mumbai Indians against Punjab Kings. The all-rounder replaced Mitchell Santner in the lineup after being bought in the mini auction.