Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ

मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ

जपानमधील महिला मंत्र्यांनी ट्रॅफिकमुळे झालेल्या पाच मिनिटांच्या उशिरासाठी चक्क सर्वांची जाहीर माफी मागितली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 18:15 IST2026-04-16T18:14:27+5:302026-04-16T18:15:27+5:30

जपानमधील महिला मंत्र्यांनी ट्रॅफिकमुळे झालेल्या पाच मिनिटांच्या उशिरासाठी चक्क सर्वांची जाहीर माफी मागितली आहे.

Sprint, 5 Minutes Delay And A Public Apology Japan’s Minister Video Goes Viral | मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ

मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ

वेळ कधीच कोणासाठीही थांबत नाही, गेलेली वेळ परत येत नाही. एक मिनिटांचा उशीर हा लोकल चुकणाऱ्या व्यक्तीला, ऑफिसमध्ये लेटमार्क लागलेल्या व्यक्तीला, हॉस्पिटलमध्ये शेवटच्या घटका मोजत असणाऱ्या व्यक्तीला विचारा असं म्हणतात. कारण त्यांना त्या वेळेची किंमत चुकवावी लागते. काही लोकांसाठी वक्तशीरपणा हा चेष्टेचा विषय आहे, तर काहींसाठी ते एक तत्व आहे. 

आपल्याकडे मंत्री, पाहुणे मंडळी एक-दोन तास उशीरा आले. तरी शाळकरी मुलांना तासंतास  बसवून ठेवलं जातं. याचा कुणाला खेद ना खंत. कार्यक्रमांसाठी रस्ते अडवून तासनतास लोकांना ताटकळत ठेवणारे किंवा उशिरा येणारे बरेच दिसतील. पण अवघ्या पाच मिनिटांच्या उशिरासाठी "सॉरी" म्हणणारे फार फार क्वचितच. याच दरम्यान एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या वेळेची खरी किंमत आणि वेळ चुकली तर कसं वागलं पाहिजे हेच सांगणारा व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. 

जपानमधील महिला मंत्र्यांनी ट्रॅफिकमुळे झालेल्या पाच मिनिटांच्या उशिरासाठी चक्क सर्वांची जाहीर माफी मागितली आहे. जपानच्या आर्थिक सुरक्षा राज्यमंत्री अकिओ ओनोडा यांचा एक व्हिडीओ सध्या जोरदार चर्चेत आहे. एका महत्त्वाच्या कॅबिनेट बैठकीला अवघ्या पाच मिनिटांचा उशीर झाल्यामुळे ओनोडा या थेट पंतप्रधान कार्यालयाच्या कॉरिडॉरमधून धावताना दिसल्या. जपानच्या वक्तशीरपणाच्या वचनबद्धतेचं हे एक उत्तम उदाहरण मानलं जात आहे.


सकाळी ८:२० च्या सुमारास सुरू झालेल्या या कॅबिनेट बैठकीला ओनोडा वेळेत पोहोचू शकल्या नाहीत, त्यामुळे सुरुवातीच्या प्रसिद्ध झालेल्या फुटेजमध्ये त्यांची खुर्ची रिकामी दिसत होती. बैठक सुरू झाल्यानंतर काही क्षणातच त्या पंतप्रधान निवासाबाहेर (कांटे) पोहोचल्या आणि शिष्टाचार बाजूला ठेवून पायऱ्यांवरून धावत सुटल्या. सुरक्षा कॅमेऱ्यात त्यांचं हे धावणं कैद झालं आणि सोशल मीडियावर "कांटे डॅश" (पंतप्रधान कार्यालयाकडे धाव घेणं) या नावाने ते ट्रेंड झालं.

यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ओनोडा यांनी जनता आणि आपल्या सहकाऱ्यांची जाहीर माफी मागितली. महामार्गावर झालेल्या एका अपघातामुळे ट्रॅफिक पूर्णपणे ठप्प झाल्याने त्यांना हा उशीर झाला होता. त्या म्हणाल्या, "हा उशीर झाला त्यासाठी मी मनापासून माफी मागते. भविष्यात मी अशा संकटांचं नियोजन अधिक काटेकोरपणे करेन." 

या घटनेमुळे जपानमधील 'वेळेच्या महत्त्वाची' पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावरील एका युजरने म्हटले की, "केवळ ५ मिनिटांसाठी केलेले हे प्रयत्न कामाबद्दल आणि समाजाबद्दलचा आदर दर्शवतात." जगातील सर्वात शिस्तबद्ध देशांपैकी एक असलेल्या जपानमध्ये, अगदी छोटासा उशीरही नियमांचे उल्लंघन मानला जातो आणि तो भरून काढण्यासाठी अशा प्रकारे माफी मागितली जाते. 

Web Title : 5 मिनट की देरी पर जापानी मंत्री ने मांगी माफी, वीडियो वायरल

Web Summary : जापान की मंत्री अकिओ ओनोडा ने ट्रैफिक के कारण कैबिनेट बैठक में पाँच मिनट की देरी के लिए सार्वजनिक रूप से माफी मांगी। समय के प्रति उनकी प्रतिबद्धता ने समय के सम्मान और पेशेवर नैतिकता पर व्यापक चर्चा छेड़ दी, जिससे जापान की प्रतिष्ठा और मजबूत हुई।

Web Title : Japanese Minister's Apology for 5-Minute Delay Goes Viral

Web Summary : A Japanese minister, Akio Onoda, publicly apologized for being five minutes late to a cabinet meeting due to traffic. Her commitment to punctuality sparked widespread discussion about respecting time and professional ethics, reinforcing Japan's reputation for discipline.