कंगनाने हृतिक रोशनला खरंच १,४३९ ईमेल पाठवले होते? अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 17:05 IST2026-04-16T17:04:01+5:302026-04-16T17:05:00+5:30

कंगना रणौत आणि सुपरस्टार हृतिक रोशन यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे.

Kangana Ranaut Hrithik Roshan Relationship Email Controversy | कंगनाने हृतिक रोशनला खरंच १,४३९ ईमेल पाठवले होते? अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा; म्हणाली...

कंगनाने हृतिक रोशनला खरंच १,४३९ ईमेल पाठवले होते? अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा; म्हणाली...

Kangana Ranaut Hrithik Roshan Controversy : बॉलिवूडची 'पंगा क्वीन' कंगना रणौत आणि सुपरस्टार हृतिक रोशन यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. हृतिक रोशनने कंगनावर आरोप केला होता की, तिने त्याला १,४३९ ईमेल पाठवले होते. याबाबत त्याने सायबर सेलमध्ये तक्रारही दाखल केली होती. एका मुलाखतीत जेव्हा कंगनाला या ईमेल्सबद्दल विचारण्यात आले, तेव्हा तिने हृतिकचे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

ईमेल वादावर बोलताना ती म्हणाली की, "जेव्हा त्याने १,४३९ ईमेल्सचा आकडा सांगितला, तेव्हा मला खूप वाईट वाटलं. मी त्याला फक्त ३ ते ४ पत्रं लिहिली होती. जेव्हा आम्ही नात्यात होतो आणि मी न्यूयॉर्कमध्ये होते, तेव्हा आम्ही एकमेकांना अनेक गोष्टी सांगायचो. मला कवितांची आवड असल्याने मी त्याला कविता लिहून पाठवत असे. त्याने याच पत्रांमधील मजकूर कॉपी-पेस्ट करून खोटा आकडा तयार केला आणि माझा अपमान करण्यासाठी त्याचा गैरवापर केला".

हृतिकसोबतच्या नात्याबाबत कंगना म्हणाली, "हो, मी त्याच्यावर प्रेम करत होते. ते नातं जबरदस्तीचं नव्हतं". तिने पुढे सांगितलं की, हृतिकने तिला स्पष्ट केलं होतं की तो एका नात्यात आहे आणि सार्वजनिकरित्या तिला स्वीकारू शकत नाही. कंगनाने दावा केला की, हृतिकनं घटस्फोटानंतर तिला भविष्यात एकत्र राहण्याबद्दल म्हटलं होतं. मात्र नंतर त्याने नातं नाकारलं. व्हॅलेंटाईन डेच्या एका प्रसंगाचा उल्लेख करत ती म्हणाली, "मी त्याला फोन का केला नाही असं विचारलं, तर त्याने "मी तुला का फोन करू?" असं उत्तर दिलं. त्या वेळी मला खूप वाईट वाटलं".  
 

Web Title : कंगना का खुलासा: क्या ऋतिक को भेजे थे 1,439 ईमेल?

Web Summary : कंगना ने ऋतिक को 1,439 ईमेल भेजने से इनकार किया, कहा उसने पत्रों का दुरुपयोग किया। कंगना ने ऋतिक से प्यार करने की बात स्वीकार की, लेकिन ऋतिक ने बाद में रिश्ते से इनकार किया।

Web Title : Kangana clarifies: Did she really send 1,439 emails to Hrithik?

Web Summary : Kangana denied sending Hrithik 1,439 emails, claiming he misused her letters. She admitted to loving him, but he later refused their relationship after promising a future together post-divorce.