उन्हात गाडीवर फिरल्याने हात, कपाळ काळवंडून गेलं? बघा टॅनिंग कमी करणारे २ झटपट उपाय

Updated:April 16, 2026 15:24 IST2026-04-16T15:18:17+5:302026-04-16T15:24:21+5:30

उन्हात गाडीवर फिरल्याने हात, कपाळ काळवंडून गेलं? बघा टॅनिंग कमी करणारे २ झटपट उपाय

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. या दिवसात त्वचेची जास्त काळजी घ्यावी लागते. अन्यथा त्वचेवरचं टॅनिंग वाढायला लागतं.(how to get rid of tanned skin in summer?)

उन्हात गाडीवर फिरल्याने हात, कपाळ काळवंडून गेलं? बघा टॅनिंग कमी करणारे २ झटपट उपाय

ज्या लोकांना या दिवसात टू व्हीलर चालवावी लागते, त्यांचे हात आणि कपाळ जास्त टॅन होते.. कपाळाचा रंग तर इतर चेहऱ्यापेक्षा खूपच वेगळा दिसायला लागतो.

उन्हात गाडीवर फिरल्याने हात, कपाळ काळवंडून गेलं? बघा टॅनिंग कमी करणारे २ झटपट उपाय

अशा पद्धतीने टॅन झालेलं कपाळ आणि हात जर पुन्हा स्वच्छ करायचे असतील तर काय उपाय घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीने करता येऊ शकतो ते पाहुया...

उन्हात गाडीवर फिरल्याने हात, कपाळ काळवंडून गेलं? बघा टॅनिंग कमी करणारे २ झटपट उपाय

पहिला उपाय करण्यासाठी एक बटाटा घ्या आणि त्याच्या गोल गोल जाडसर चकत्या करा.

उन्हात गाडीवर फिरल्याने हात, कपाळ काळवंडून गेलं? बघा टॅनिंग कमी करणारे २ झटपट उपाय

त्यावर थोडा मध, कॉफी आणि पिठीसाखर घाला. आता या चकत्या तुमच्या टॅन झालेल्या त्वचेवर चोळा. १० मिनिटांनी चेहरा धुऊन टाका. त्वचा स्वच्छ होईल.

उन्हात गाडीवर फिरल्याने हात, कपाळ काळवंडून गेलं? बघा टॅनिंग कमी करणारे २ झटपट उपाय

दुसरा उपाय करण्यासाठी बटाट्याचा रस, लिंबाचा रस आणि दही एका भांड्यात सम प्रमाणात एकत्र करा. त्यात थोडं मसूर डाळीचे पीठ घाला. आता हा लेप त्वचेला लावा.. १० मिनिटांनी लेप थोडा सुकल्यावर चोळून काढून टाका. टॅनिंग बरंच कमी झालेलं दिसेल.