उकाडा वाढला-घामानं हैराण? दिवसभरात हे ५ पदार्थ नक्की खा, मिळेल थंडावा-लाहीलाही होईल कमी

Updated:April 15, 2026 18:05 IST2026-04-15T16:04:14+5:302026-04-15T18:05:08+5:30

Summer Diet (5 Special Foods to Eat In These Summer) How To Stay Cool In Summer : उन्हाळ्यात चहा किंवा कॉफीचे प्रमाण कमी करून जास्तीत जास्त लिंबू सरबत किंवा कोकम सरबत पिण्यावर भर द्या.

उकाडा वाढला-घामानं हैराण? दिवसभरात हे ५ पदार्थ नक्की खा, मिळेल थंडावा-लाहीलाही होईल कमी

उन्हाळ्याच्या दिवसांत (Summer) शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते आणि उष्णतेमुळे थकवा जाणवतो (Heat Wave Hydration Tips). अशावेळी शरीर आतून थंड ठेवण्यासाठी आहारात काही विशिष्ट पदार्थांचा समावेश करायला हवा. (Top 5 Best Foods To Eat In Summer For Staying Cool)

उकाडा वाढला-घामानं हैराण? दिवसभरात हे ५ पदार्थ नक्की खा, मिळेल थंडावा-लाहीलाही होईल कमी

कलिंगडामध्ये जवळपास ९२ टक्के पाणी असते. उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी हे सर्वोत्तम फळ आहे.

उकाडा वाढला-घामानं हैराण? दिवसभरात हे ५ पदार्थ नक्की खा, मिळेल थंडावा-लाहीलाही होईल कमी

दही हे नैसर्गिकरित्या थंड असते. दुपारच्या जेवणात ताकाचा समावेश करणं अमृतासारखे आहे. दही प्रोबायोटीक असल्यामुळे पचनसंस्था सुधारते आणि पोटातील जळजळ कमी होते. ताकामध्ये थोडं जीरं आणि काळं मीठ घातल्यास शरीराला गारवा मिळतो.

उकाडा वाढला-घामानं हैराण? दिवसभरात हे ५ पदार्थ नक्की खा, मिळेल थंडावा-लाहीलाही होईल कमी

उन्हामुळे घामावाटे शरीरातील क्षार बाहेर पडतात त्याची कमतरता शहाळ्याचे पाणी भरून काढते हे पाणी प्यायल्यानं त्वरीत ऊर्जा मिळते आणि शरीर थंड होते.

उकाडा वाढला-घामानं हैराण? दिवसभरात हे ५ पदार्थ नक्की खा, मिळेल थंडावा-लाहीलाही होईल कमी

पुदिना हा त्याच्या सुवासिक आणि थंडावा देणाऱ्या गुणधर्मांसाठी ओळखला जातो. पुदिन्यामुळे पचनक्रिया सुलभ होते आणि शरीराला ताजेतवानं वाटते. लिंबू सरबत, पन्ह किंवा ताकामध्ये पुदिन्याची पानं घालून तुमही याचा वापर करू शकता.

उकाडा वाढला-घामानं हैराण? दिवसभरात हे ५ पदार्थ नक्की खा, मिळेल थंडावा-लाहीलाही होईल कमी

काकडीत पाण्याचे प्रमाण भरपूर असते. यात फायबर्सदेखील असतात. काकडी खाल्ल्यानं शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते आणि शरीराचे तापमान नियंत्रणात राहते.

उकाडा वाढला-घामानं हैराण? दिवसभरात हे ५ पदार्थ नक्की खा, मिळेल थंडावा-लाहीलाही होईल कमी

उन्हाळ्यात चहा किंवा कॉफीचे प्रमाण कमी करून जास्तीत जास्त लिंबू सरबत किंवा कोकम सरबत पिण्यावर भर द्या. बाहेरील थंड पेयांपेक्षा घरगुती नैसर्गिक पेय आरोग्यासाठी अधिक चांगली असतात.