ऑडिशन नाही, स्ट्रगल नाही; फेसबुक फोटोमुळे बनली टॉपची हिरोईन, कोण आहे ती सुंदरी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 18:18 IST2026-04-15T18:09:26+5:302026-04-15T18:18:23+5:30

चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार असे असतात ज्यांचा प्रवास नशिबाच्या जोरावर घडलेला असतो.

चित्रपटसृष्टीत नशीब आजमावण्यासाठी हजारो तरुण-तरुणी दररोज ऑडिशन देतात. पण कधीकधी नशीब अशा प्रकारे फळफळतं की तुम्हाला शोधावं लागत नाही, तर संधीच तुम्हाला शोधत येते.

असंच काहीसं घडलं संयुक्ता मेनन हिच्यासोबत. फेसबुकवरील एका साध्या फोटोने तिचं आयुष्यच बदलून टाकलं.

संयुक्ताचा अभिनेत्री बनण्याचा प्रवास खूपच रंजक आहे. कॉलेजला जाण्यापूर्वी एका फोटोग्राफरने तिचा फोटो फेसबुकवर पाहिला होता. त्या फोटोमुळे तिला एका प्रसिद्ध मासिकाच्या कव्हर पेजसाठी फोटोशूटची संधी मिळाली.

तोच फोटो एका निर्मात्याने पाहिला आणि तिला पहिल्या चित्रपटाची ऑफर दिली. कोणत्याही ऑडिशनशिवाय संयुक्ताचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला.

संयुक्ता म्हणते, "मला या क्षेत्रात संधी सहज मिळाली, पण इथे टिकून राहण्यासाठी आणि अभिनय शिकण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली".

फेसबुकवरील एका फोटोमुळे जिचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला, ती संयुक्ता आता बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्री काजोल आणि तब्बू यांच्यासोबत हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

२०१६ मध्ये 'पॉपकॉर्न' या मल्याळम चित्रपटातून करिअरची सुरुवात करणाऱ्या संयुक्ताने आतापर्यंत धनुष, पवन कल्याण आणि पृथ्वीराज सुकुमारन यांसारख्या बड्या स्टार्ससोबत काम केले आहे.

आता ती काजोलची मुख्य भूमिका असलेल्या 'महारांगिनी: क्वीन ऑफ क्वीन्स' या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवत आहे.

"मी हिंदी चित्रपट बघत मोठी झाले, त्यामुळे या इंडस्ट्रीचा भाग होणं हे माझं स्वप्न होतं," अशा भावना तिने व्यक्त केल्या आहेत.

संयुक्ता केवळ काजोलसोबतच नाही, तर विजय सेतुपती आणि तब्बू यांच्या 'स्लमडॉग' या चित्रपटातही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

तब्बूबाबत बोलताना संयुक्ता म्हणाली, "तब्बूला प्रत्यक्ष पाहणं हा माझ्यासाठी एक 'फॅनगर्ल' मोमेंट होता. ती आजही तितकीच सुंदर दिसते. तिची वागणूक आणि तिचा आत्मविश्वास मला खूप प्रेरणा देतो".