तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 18:42 IST2026-04-15T18:40:52+5:302026-04-15T18:42:26+5:30

तुर्कीच्या कहरामनमारस प्रांतातील एका माध्यमिक शाळेत झालेल्या गोळीबारात ४ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत.

turkey school shooting several dead and injured in kahramanmaras province | तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना

फोटो - AFP

तुर्कीच्या कहरामनमारस प्रांतातील एका माध्यमिक शाळेत झालेल्या गोळीबारात ४ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला आयसर कॅलिक माध्यमिक शाळेत झाला. शाळेतील एका विद्यार्थ्यानेच अचानक गोळीबार सुरू केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथकं तातडीने घटनास्थळी दाखल झाली असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कहरामनमारसचे गव्हर्नर मुकेर्रम उनलुएर यांनी ४ जणांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत हल्लेखोर विद्यार्थीही मारला गेल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या हल्ल्यात किमान २० लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. गोळीबाराची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर विद्यार्थी आपल्या वडिलांची बंदूक बॅगेत लपवून शाळेत घेऊन आला होता. त्याचे वडील एक सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी आहेत. मृतांमध्ये एक शिक्षक आणि तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या हल्ल्यामागचं नेमकं कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला असून नवीन माहिती समोर येताच ती प्रसिद्ध केली जाईल, असं प्रशासनाने सांगितलं आहे.

तुर्कीमध्ये अलीकडच्या काळात गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दोन दिवसांतील ही दुसरी मोठी घटना आहे. याच्या एक दिवस आधी सानलिउर्फा प्रांतातील एका हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्याने केलेल्या गोळीबारात १६ जण जखमी झाले होते. त्यानंतर त्याने स्वतःवरही गोळी झाडून घेतली होती, ज्यात त्याचा मृत्यू झाला. यापूर्वी ७ एप्रिल रोजी इस्तंबूलमधील इस्रायली दूतावासाजवळ झालेल्या गोळीबारात एका हल्लेखोराचा मृत्यू झाला होता आणि ४ जण जखमी झाले होते. या सर्व घटनांचा सखोल तपास सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

Web Title : तुर्की के स्कूल में गोलीबारी, 4 की मौत, 20 घायल; दो दिनों में दूसरी घटना

Web Summary : तुर्की के कहरामनमारस प्रांत के एक स्कूल में गोलीबारी में 4 लोगों की मौत हो गई, 20 घायल। एक छात्र ने आइसर कैलिक स्कूल में गोलीबारी की। मृतकों में हमलावर, एक शिक्षक और तीन छात्र शामिल हैं। दो दिनों में तुर्की में यह दूसरी घटना है।

Web Title : School Shooting in Turkey Kills 4, Injures 20; Second Incident

Web Summary : A school shooting in Turkey's Kahramanmaras province resulted in 4 deaths and 20 injuries. A student opened fire at Iser Calik school. The attacker, a teacher and three students are among the dead. It's the second shooting in Turkey in two days.