श्रीकृष्णाची कथा सांगणाऱ्या 'कृष्णावतारम'चा ट्रेलर रिलीज; अध्यात्माचा दिव्य संगम पाहून चाहते थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 17:30 IST2026-04-15T17:23:19+5:302026-04-15T17:30:32+5:30
मथुरेच्या पावन भूमीवर चित्रपट आणि अध्यात्म यांच्यातील एक अभूतपूर्व सोहळा पाहायला मिळाला. बहुप्रतिक्षित 'कृष्णावतारम' चित्रपटाचा ट्रेलर पवित्र कृष्ण जन्मभूमीवर प्रदर्शित करण्यात आला

श्रीकृष्णाची कथा सांगणाऱ्या 'कृष्णावतारम'चा ट्रेलर रिलीज; अध्यात्माचा दिव्य संगम पाहून चाहते थक्क
मथुरेच्या पावन भूमीवर चित्रपट आणि अध्यात्म यांच्यातील एक अभूतपूर्व सोहळा पाहायला मिळाला. बहुप्रतिक्षित 'कृष्णावतारम' चित्रपटाचा ट्रेलर पवित्र कृष्ण जन्मभूमीवर प्रदर्शित करण्यात आला, ज्यामुळे हजारो भक्तांना श्रद्धेच्या एका शक्तिशाली सामूहिक अनुभवात स्वतःला जोडता आले. ट्रेलर लाँच म्हणून सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे स्वरूप इतके वेगळे झाले की सगळीकडे अध्यात्माचे वातावरण निर्माण झाले. प्रभू श्रीकृष्णाच्या जन्मस्थानी भक्तांनी मोठी गर्दी केली होती आणि संपूर्ण वातावरण जयघोषाने दुमदुमून गेले होते.
या ट्रेलर लाँचचा विस्तार केवळ एका ठिकाणापुरता मर्यादित नव्हता. तर तो रमण रेती मंदिर, राधा राणी मंदिर, प्रेम मंदिर आणि इस्कॉन वृंदावन यांसारख्या अनेक प्रमुख पवित्र स्थळांतील लोकांपर्यंत पोहोचला. यामुळे या कार्यक्रमाला एक वेगळेच स्वरूप प्राप्त झाले. निर्मात्यांनी या चित्रपटाला एक 'भावपूर्ण सादरीकरण' असे संबोधले आहे. हा चित्रपट केवळ भव्यता दाखवण्यासाठी नाही, तर जगभरातील भक्तांना एक खोल भावनिक आणि आध्यात्मिक सिनेमॅटिक अनुभव देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे.
प्रकाश कापडिया आणि राम मोरी यांनी लिहिलेल्या या चित्रपटाचे छायांकन अयानंका बोस यांनी केले आहे. चित्रपटाला प्रसाद एस. यांचे संगीत लाभले असून प्रसिद्ध गीतकार इरशाद कामिल यांनी गाणी लिहिली आहेत. याशिवाय प्रोडक्शन डिझाईन चोक्कस भारद्वाज यांचे असून वेशभूषा निधी यशा यांनी डिझाइन केली आहे. 'कृष्णावतारम'चे जागतिक स्तरावर वितरण एए फिल्म्सद्वारे केले जाणार असून याचे संगीत सारेगामा द्वारे रिलीज केले जाईल.
केवळ एका चित्रपटापेक्षाही पुढे जाऊन 'कृष्णावतारम' हे भक्तीचे दिव्य रूप म्हणून समोर येत आहे. दैवी प्रेमाची कथा एका अभूतपूर्व स्तरावर मोठ्या पडद्यावर सादर होणार आहे. हार्दिक गज्जर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची निर्मिती क्रिएटिवलँड स्टुडिओज एंटरटेनमेंटचे साजन राज कुरुप आणि शोभा संत, तसेच अथाश्रीकथा मोशन पिक्चर्सचे पूनम श्रॉफ आणि पार्थ गज्जर यांनी केली आहे. तीन भागांच्या मालिकेतील पहिला अध्याय ७ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.