यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 18:02 IST2026-04-15T17:53:16+5:302026-04-15T18:02:55+5:30

Yavatmal Accident: साईकिरण गोडगुल्ला कार चालवत होते. साखरा गावाजवळ नियंत्रण सुटल्याने कार पांढरकवडाकडून येत असलेल्या बोअरवेलच्या ट्रकवर धडकली.

Car hits truck, father dies on the spot along with six-month-old baby in yavatmal; mother seriously injured | यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी

यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी

घाटंजी (यवतमाळ) : बोअरवेलच्या ट्रकवर कार धडकून झालेल्या अपघातात सहा महिन्यांच्या चिमुकलीसह तिच्या वडिलांचा मृत्यू झाला, तर आई गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवारी (१४ एप्रिल) रात्री ८ वाजेच्या सुमारास पांढरकवडा मार्गावर साखरा (खु.) नजीक आश्रमशाळेजवळ घडली. या अपघातात संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले.

हंसिका गोडगुल्ला (सहा महिने), साईकिरण गोडगुल्ला (३०) अशी मृतांची नावे आहेत. अनुष्का साईकिरण गोडगुल्ला (२५) या गंभीर जखमी असून, त्यांच्यावर यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

आदिलाबादचे गोडगुल्ला हे कुटुंब मंगळवारी घाटंजी येथील सिद्धार्थ रामटेके यांच्याकडे पाहुणे म्हणून आले होते. रात्री चारचाकी वाहनाने (क्र. टीजी ०३ बी ७५२४) परतीच्या प्रवासाला निघाले होते. साईकिरण गोडगुल्ला कार चालवत होते. साखरा गावाजवळ नियंत्रण सुटल्याने कार पांढरकवडाकडून येत असलेल्या बोअरवेलच्या ट्रकवर (क्र. केए ०१ एमजी ३९८७) जाऊन आदळली.

माहिती मिळताच परिसरातील नागरिक घटनास्थळी धाव घेतली. कारमधील तिघांनाही त्यांनी घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. 

डॉक्टरांनी चिमुकली हंसिका आणि तिचे वडील साईकिरण गोडगुल्ला यांचा मृत घोषित केले, तर अनुष्का साईकिरण गोडगुल्ला यांना प्राथमिक उपचारानंतर यवतमाळ येथे रवाना केले. अपघात एवढा भीषण होता की कारचा समोरच्या भागाचा पूर्ण चेंदामेंदा झाला आहे.

 

Web Title : यवतमाल: कार-ट्रक टक्कर में पिता, बच्ची की मौत; माँ गंभीर रूप से घायल

Web Summary : यवतमाल में एक कार की ट्रक से टक्कर में पिता और छह महीने की बच्ची की मौत हो गई। मां गंभीर रूप से घायल है और उसका इलाज चल रहा है। यह दुर्घटना पांढरकवड़ा मार्ग पर साखर गांव के पास हुई जब कार नियंत्रण खो बैठी और एक बोरवेल ट्रक से टकरा गई।

Web Title : Yavatmal: Car-Truck Collision Kills Father, Baby; Mother Seriously Injured

Web Summary : A car collided with a truck in Yavatmal, killing a father and his six-month-old daughter. The mother was critically injured and is receiving treatment. The accident occurred near Sakhra village on the Pandharkawda road when the car lost control and hit a borewell truck.