इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 18:01 IST2026-04-15T18:00:41+5:302026-04-15T18:01:32+5:30

Russia Supports Iran's Nuclear Rights: रशियाने इराणच्या युरेनियम समृद्धीकरणाच्या अधिकाराचे समर्थन केले आहे.

Russia Supports Iran's Nuclear Rights: Russia's entry for Iran's nuclear rights! Putin's support for uranium enrichment; US pressure prevailed | इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला

इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला

इराण आणि अमेरिका यांच्यातील अणू कराराचा पेच गडद होत असतानाच, रशियानेइराणच्या 'युरेनियम समृद्धीकरणाच्या' अधिकाराचे जोरदार समर्थन केले आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी बीजिंगमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले की, शांततापूर्ण उद्देशांसाठी युरेनियम समृद्ध करणे हा इराणचा "अविभाज्य अधिकार" आहे आणि रशिया या तत्त्वाशी ठाम आहे.

अमेरिकेने इराणसमोर 'शून्य युरेनियम समृद्धीकरणाची' अट ठेवली असताना, रशियाने मात्र इराणला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. रशियाने एक महत्त्वाचा प्रस्तावही दिला आहे. भविष्यातील शांतता कराराचा भाग म्हणून इराणचा समृद्ध युरेनियमचा साठा स्वतःकडे घेण्याची तयारी रशियाने दर्शवली आहे, जेणेकरून अमेरिकेची भीती दूर होईल. इराणने मांडलेल्या वास्तवावादी आणि न्याय्य मागण्यांचा विचार व्हायला हवा, असे मत रशियाने व्यक्त केले आहे.

जागतिक तणाव आणि चर्चेचा पेच
डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने इराणवर कडक निर्बंध लादले असताना आणि होर्मुजच्या सामुद्रधुनीत नाकेबंदीची धमकी दिली असताना, रशिया आणि चीनच्या वाढत्या मैत्रीमुळे अमेरिकेच्या रणनीतीला मोठे आव्हान मिळाले आहे. इराण केवळ ५ वर्षांसाठी आपला अणू कार्यक्रम स्थगित करण्यास तयार आहे, तर अमेरिका २० वर्षांच्या स्थगितीवर ठाम आहे. या ओढाताणीत रशियाची 'एन्ट्री' गेमचेंजर ठरू शकते.

Web Title : ईरान के परमाणु मुद्दे में रूस की एंट्री, यूरेनियम संवर्धन का समर्थन

Web Summary : रूस ने ईरान के यूरेनियम संवर्धन के अधिकार का समर्थन किया, अमेरिका के 'शून्य संवर्धन' की मांग को चुनौती दी। रूस, ईरान के समृद्ध यूरेनियम भंडार को रखने की पेशकश कर गतिरोध तोड़ने और अमेरिकी चिंताओं को दूर करने का प्रयास कर रहा है।

Web Title : Russia Enters Iran Nuclear Deal Fray, Backs Uranium Enrichment

Web Summary : Russia supports Iran's right to enrich uranium for peaceful purposes, challenging US demands for zero enrichment. Offering to store Iran's enriched uranium, Russia aims to break the deadlock and address US concerns amid rising global tensions.