तब्बल ३ वर्षानंतर लोकप्रिय अभिनेता टीव्हीवर परतला; 'या' मालिकेत दिसणार महत्वाच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 16:48 IST2026-04-16T16:38:28+5:302026-04-16T16:48:40+5:30

३ वर्षानी कमबॅक!मालिकाविश्वात लोकप्रिय अभिनेता परतला, 'या' मालिकेत साकारणार भूमिका 

marathi actor vikas patil comeback on television in anandi serial new promo viral | तब्बल ३ वर्षानंतर लोकप्रिय अभिनेता टीव्हीवर परतला; 'या' मालिकेत दिसणार महत्वाच्या भूमिकेत

तब्बल ३ वर्षानंतर लोकप्रिय अभिनेता टीव्हीवर परतला; 'या' मालिकेत दिसणार महत्वाच्या भूमिकेत

Television: स्टार प्रवाह वाहिनीवर नुकतीच आनंदी ही नवोकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या वेगळ्या धाटणीच्या मालिकेत एका अंध मुलीची कथा पाहायला मिळत आहे.या मालिकेतील 'आनंदी'चा साधेपणा हा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. एका अपघातात दृष्टी गमावलेल्या, पण तरीही जीवनाकडे अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनाने पाहणाऱ्या तरुणीची गोष्ट 'आनंदी'ची गोष्ट हृदयाला भिडणारी आहे. अशातच आता या मालिकेत एका लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे, तो नेमका कोण आहे? जाणून घेऊया...


‘आनंदी’ या मालिकेत युगंधरच्या धाकट्या भावाची एन्ट्री झाली आहे. ही भूमिका अभिनेता विकास पाटील साकारताना दिसणार आहे. विकास पाटील जवळपास ४ वर्षांनंतर तो मालिकाविश्वात दमदार पुनरागमन करत आहे. नुकताच स्टार प्रवाह वाहिनीने या मालिकेचा नवा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.या मालिकेच्या निमित्ताने तो जवळपास तीन वर्षांनी टीव्हीवर कमबॅक करतो आहे.

दरम्यान,‘आनंदी’ या मालिकेत अभिनेत्री जाई खांडेकरची प्रमुख भूमिका आहे. तसेच समीर धर्माधिकारी, अरुण नलावडे यांच्या देखील महत्वाच्या भूमिका आहेत. एकीकडे युगंधरच्या हातून निसटणारं मोठं कॉन्ट्रॅक्ट आनंदीच्या हुशारीमुळे त्याच्या कारखान्याला परत मिळतं. त्यामुळे युगंधर आनंदीवर प्रचंड खुश होतो. अशातच त्याची भावाची एन्ट्री झाली आहे.
 
विकास पाटीलच्या कामाबद्दल बोलायचं तर त्याने याआधी ‘गोळा बेरीज’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘तुकाराम’, ‘अधुरी एक कहाणी’, ‘तुझ्याविन मरजावा’, ‘वर्तुळ’, ‘अशी बायको हवी’, ‘गडबड झाली’, अशा अनेक मालिका आणि चित्रपटांतून अभिनेता विकास पाटीलने प्रेक्षकांचे मनोरंजन केलंय.तसेच तो बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातही झळकला होता.

Web Title : अभिनेता विकास पाटिल 3 साल बाद 'आनंदी' से टीवी पर वापसी

Web Summary : विकास पाटिल स्टार प्रवाह पर 'आनंदी' के कलाकारों में शामिल होने के लिए तैयार हैं, जो चार साल बाद टेलीविजन पर उनकी वापसी का प्रतीक है। वह श्रृंखला में एक महत्वपूर्ण भूमिका निभाएंगे, जिसमें जय खांडेकर और समीर धर्माधिकारी भी हैं। पाटिल को पहले 'बिग बॉस मराठी 3' में देखा गया था।

Web Title : Actor Vikas Patil Returns to TV After 3 Years in 'Anandi'

Web Summary : Vikas Patil is set to join the cast of 'Anandi' on Star Pravah, marking his return to television after four years. He will play a significant role in the series, which stars Jai Khandekar and Samir Dharmadhikari. Patil was previously seen in 'Bigg Boss Marathi 3'.