काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ

सनरायझर्स हैदराबादच्या संघातील डावखुरा वेगवान गोलंदाज घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे

By सुशांत जाधव | Updated: April 16, 2026 17:42 IST2026-04-16T17:37:45+5:302026-04-16T17:42:12+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 SRH vs CSK Kavya Maran's team SRH suffer huge blow just as Pat Cummins recovers, star pacer ruled out of IPL 2026 | काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ

काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ

हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर १८ एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध होणाऱ्या आयपीएल २०२६ च्या मोठ्या लढती आधी सनरायझर्स हैदराबादला (SRH) मोठा धक्का बसला आहे. एका रात्रीत दोन प्रफुल हिंगे आणि साकिब हुसेन यांच्या रुपात दोन स्टार लॉन्च केल्यामुळे गोलंदाजीत 'अच्छे दिन' आल्याची चर्चा रंगत असताना SRH च्या ताफ्यातील स्टार गोलंदाज उर्वरित स्पर्धेतून बाहेर पडला आहे. सनरायझर्स हैदराबादच्या संघाने आपल्या ताफ्यातील डेव्हिड पेन हा दुखापतीमुळे उर्वरित हंगामात संघासोबत नसेल, यासंदर्भातील अधिकृत माहिती दिली आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

सनरायझर्स हैदराबादची अधिकृत घोषणा

सनरायझर्स हैदराबादच्या संघातील डावखुरा वेगवान गोलंदाज घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. काव्या मारनच्या ऑरेंज आर्मीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली आहे. या गोलंदाजाच्या बदली खेळाडूच्या रुपात सनरायझर्स हैदराबाद कोणता डाव खेळणार ते पाहण्याजोगे असेल. 

IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव

SRH नं याआधी MI च्या खेळाडूवर खेळला होता डाव

याआधी सनरायझर्स हैदराबादच्या संघाच्या ताफ्यातील ब्रायडन कार्स याने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली होती. त्याच्या जागी SRH च्या संघाने MI च्या ताफ्यातून खेळलेला श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज दिलशान मदुशंका याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. आता आणखी एक खेळाडू जायबंदी झाल्यावर हा संघ कोणता डाव खेळणार ते पाहण्याजोगे असेल.

पॅट कमिन्सचं काय? 

सनरायझर्स हैदराबाद संघाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स पाठीच्या दुखापतीमुळे पहिल्या काही सामन्याला मुकला होता. तो या दुखापतीतून सावरला असून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या स्टार खेळाडूला आयपीएल खेळण्यासाठी हिरवा कंदील दाखवल्याचेही वृत्त समोर आले आहे. तो लवकर संघाला जॉईन होईल, अशी आशा आहे. 

Web Title : SRH को झटका: डेविड पायने बाहर, कमिंस की वापसी की उम्मीदें बरकरार।

Web Summary : डेविड पायने के चोट के कारण बाहर होने से सनराइजर्स हैदराबाद को झटका लगा है। इससे पहले, ब्रायडन कार्स की जगह दिलशान मदुशंका को शामिल किया गया था। क्रिकेट ऑस्ट्रेलिया की हरी झंडी के साथ पैट कमिंस की पीठ की चोट से वापसी की उम्मीदें बरकरार हैं।

Web Title : SRH setback: David Payne exits; Cummins return hopes remain.

Web Summary : Sunrisers Hyderabad faces a blow as David Payne is ruled out due to injury. Earlier, they replaced Brydon Carse with Dilshan Madushanka. Hopes remain for Pat Cummins' return from a back injury, with Cricket Australia giving the green light.