IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव

तगड्या फलंदाजीसह आता SRH च्या गोलंदाजीतील ताकद वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 20:00 IST2026-04-14T19:50:24+5:302026-04-14T20:00:38+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 Kavya Maran Owned Teams Sunrisers Hyderabad Pick Dilshan Madushanka As Injury Replacement For Brydon Carse | IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव

IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव

Dilshan Madushanka in SRH : आयपीएल २०२६ च्या हंगामात एका रात्रीत प्रफुल हिंगे आणि साकिब हूसेन या जलगती गोलंदाजांच्या रुपात दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च करणाऱ्या काव्या मारनच्या मालकीच्या सनरायझर्स हैदराबादनं बदली खेळाडूच्या रुपात नवा डाव खेळला आहे. गोलंदाजी आणखी भक्कम करण्यासाठी SRH च्या संघाने IPL मध्ये कधीकाळी MI च्या ताफ्यातून खेळलेला श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज दिलशान मदुशंका याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. ब्रायडन कार्स याने दुखापतीमुळे यंदाच्या हंगामातून माघार घेतली असून त्याच्या जागी श्रीलकंन गोलंदाजाला संधी देण्यात आली आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

MI च्या ताफ्यातून दाखवली होती गोलंदाजीतील धार


 
डावखुऱ्या हाताचा जलदगती गोलंदाज दिलशान मदुशंका याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या गोलंदाजीतील धार दाखवून दिली आहे.  श्रीलंकेच्या संघाकडून तो १ कसोटी, २८ एकदिवसीय सामने आणि १९ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले असून त्याच्या खात्यात ७० विकेट्सची नोंद आहे. नव्या चेंडूवर विकेट घेण्याची क्षमता असणारा हा गोलंदाज SRH साठी ट्रम्प कार्ड ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल. SRH  फ्रेंचायजी संघाने ७५ लाखांसह त्याला आपल्या संघात घेतलं आहे. याआधी त्याने IPL मध्ये  MI कडून आपल्या गोलंदाजीची दाखवून दिली आहे.

VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा

तगड्या फलंदाजीसह आता SRH च्या गोलंदाजीतील ताकद वाढली

राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून प्रफुल हिंगे आणि साकिब हूसेन या भारतीय अनकॅप्ड जोडीनं दमदार कमबॅक केले. प्रत्येकी ३०-३० लाखांच्या गड्यांनी कोट्यवधीच्या खेळाडूंना लाजवेल, अशी कामगिरी करून दाखवली. आता SRH चा नवा डावही स्वस्तात मस्त ठरणार का? याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगत आहे. पॅट कमिन्सही लवकरच संघात सामील होईल, अशी अपेक्षा आहे. धाकड फलंदाजीसोबत गोलंदाजीतील ताकद वाढल्यास SRH चा संघ प्रतिस्पर्धी संघासमोर मोठे आव्हान निर्माण करू शकतो. 

Web Title : आईपीएल 2026: एसआरएच ने श्रीलंकाई तेज गेंदबाज मदुशंका को टीम में शामिल किया

Web Summary : सनराइजर्स हैदराबाद (एसआरएच) ने आईपीएल 2026 के लिए श्रीलंकाई तेज गेंदबाज दिलशान मदुशंका को ब्रायडन कार्स के चोटिल होने के बाद टीम में शामिल किया है। एसआरएच ने भारतीय अनकैप्ड खिलाड़ियों के प्रदर्शन को भी देखा। टीम को कमिंस के जल्द आने की उम्मीद है।

Web Title : IPL 2026: SRH Boosts Bowling with Sri Lankan Pacer Madushanka

Web Summary : Sunrisers Hyderabad (SRH) bolstered their bowling attack for IPL 2026 by adding Sri Lankan fast bowler Dilshan Madushanka as a replacement. He joins after Brydon Carse's injury. SRH also saw strong performances from Indian uncapped players. The team hopes for Cummins' arrival soon.