"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 17:20 IST2026-04-16T17:18:29+5:302026-04-16T17:20:26+5:30

"अखिलेश जी माझे मित्र आहेत, यामुळे ते कधीकधी माझी मदत करतात." मोदींचे हे विधान ऐकताच सभागृहात हशा पिकला आणि स्वतः अखिलेश यादव यांनाही आपले हसू रोखता आले नाही.

"Akhilesh, my friend, sometimes...!"; What exactly did Modi say in the Lok Sabha? Akhilesh Yadav folded his hands! | "अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!

"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!

लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर सध्या चर्चा सुरू आहे. यावेळी एक अत्यंत रंजक क्षण बघायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणादरम्यान समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचा उल्लेख 'मित्र' असा केला. ते म्हणाले, "अखिलेश जी माझे मित्र आहेत, यामुळे ते कधीकधी माझी मदत करतात." मोदींचे हे विधान ऐकताच सभागृहात हशा पिकला आणि स्वतः अखिलेश यादव यांनाही आपले हसू रोखता आले नाही.

नेमकं काय घडलं...?
पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलत असताना, मधेच सपा खासदार धर्मेंद्र यादव काही  बोलले. यावेळी मोदी थांबवे. यानंतर उत्तर देताना मोदींनी मिश्किलपणे धर्मेंद्र यादव यांचे आभार मानले आणि म्हणाले, "आपण माझी ओळख करून दिलीत त्याबद्दल धन्यवाद. हे खरे आहे की, मी अति मागास समाजातून येतो. अखिलेश जी माझे मित्र आहेत, ते कधी-कधी मला मदत करतात." पंतप्रधानांच्या या कोटीवर अखिलेश यादव यांनीही हात जोडून दाद दिली. मोदी पुढे म्हणाले, अति मागास समाजातून येऊनही संविधानाने दिलेल्या ताकदीमुळेच आज मी या पदावर आहे आणि सर्वांना सोबत घेऊन चालणे हे माझे कर्तव्य आहे.

हे २५-३० वर्षांपूर्वीच व्हायला हवे होते-
मोदी पुढे म्हणाले,"हे विधेयक २५-३० वर्षांपूर्वीच लागू करायला हवे होते. पण आता ही ऐतिहासिक संधी आपल्या सर्वांना मिळाली आहे. देशाच्या धोरण निश्चिती प्रक्रियेत ५० टक्के लोकसंख्या असलेल्या महिलांचा वाटा असणे ही काळाची गरज आहे. ज्यांनी ज्यांनी या अधिकाराला विरोध केला, त्यांना देशातील महिलांनी कधीच माफ केले नाही, असा इशाराही मोदी यांनी राजकीय पक्षांना दिला. हे विधेयक कोणत्याही एका पक्षाच्या फायद्यासाठी नाही. तर देशाच्या लोकशाहीच्या बळकटीसाठी अत्यंत महत्वाचे आहे असेही ते म्हणाले.

 

Web Title : संसद में मोदी ने अखिलेश को 'दोस्त' कहा, हंसी और हाथ जोड़े गए!

Web Summary : महिला आरक्षण पर संसदीय बहस के दौरान, पीएम मोदी ने मज़ाकिया अंदाज़ में अखिलेश यादव को अपना 'दोस्त' कहा, जिससे हंसी फैल गई। मोदी ने अपनी स्थिति के लिए संविधान को श्रेय दिया, समावेशिता पर जोर दिया। उन्होंने विधेयक को तुरंत पारित करने की वकालत की, नीति-निर्माण में महिलाओं की महत्वपूर्ण भूमिका पर जोर दिया और विरोध करने वालों को चेतावनी दी।

Web Title : Modi calls Akhilesh 'friend' in Parliament, sparks laughter and folded hands.

Web Summary : During a parliamentary debate on women's reservation, PM Modi playfully called Akhilesh Yadav his 'friend,' sparking laughter. Modi credited the constitution for his position, emphasizing inclusivity. He advocated for the bill's prompt passage, stressing women's crucial role in policy-making and warning against opposing it.