"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 15:52 IST2026-04-16T15:52:11+5:302026-04-16T15:52:31+5:30

एएनआयच्या एका पॉडकास्ट मुलाखतीत तिने या विषयावर रोखठोक आणि मजेशीर शैलीत भाष्य केले आहे. 

If I had an affair with Chirag Paswan we-would-have-had-children-by-now Kangana Ranaut spoke bluntly | "जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली

"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली

बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत सध्या आपल्या एका खळबळजनक विधानामुळे जबरदस्त चर्चेत आहे. केंद्रीय मंत्री आणि लोजपा प्रमुख चिराग पासवान यांच्यासोबत नाव जोडले जात असल्याच्या चर्चांना कंगनाने पूर्णविराम दिला. एएनआयच्या एका पॉडकास्ट मुलाखतीत तिने या विषयावर रोखठोक आणि मजेशीर शैलीत भाष्य केले आहे. 

काय म्हणाली कंगना? -
 कंगना म्हणाली, "मी चिराग पासवान यांना गेल्या १० वर्षांपासून ओळखते. आमच्यात जर काही प्रेमप्रकरण किंवा रोमान्स असता, तर आतापर्यंत आम्हाला मुलंही झाली असती." खरे तर, संसदेतील त्यांच्या भेटीचे व्हायरल फोटो आणि व्हिडिओंसंदर्भात प्रश्न विचारला असता कंगना म्हणाली, चिराग एक चांगले मित्र आहेत. लोक विनाकारण त्यांच्या मागे लागले आहेत, यामुळे आता ते मला पाहिल्यानंतर रस्ताही बदलतात, अशी मिश्किल टिप्पणीही कंगनाने यावेळी केली. कंगना आणि चिराग यांनी २०११ मध्ये 'मिले ना मिले हम' या चित्रपटात एकत्र काम केले आहे.

याच मुलाखतीत कंगनाने राहुल गांधींवरही भाष्य केले. ती म्हणाली, मी राहुल गांधी यांच्या डोक्यावर विनाकारणच असा ताज ठेऊ शकत नाही, ज्यासाठी ते पात्र नाहीत. याच वेळी पंतप्रधान मोदींचे कंगनाने कौतुक केले. महिला आरक्षण विधेयकाचा उल्लेख करत ती म्हणाली की, मोदींचे व्यक्तिमत्व समानतेवर आधारित आहे.

 

Web Title : कंगना रनौत ने चिराग पासवान के साथ अफेयर को नकारा, बच्चे होने पर कसा तंज

Web Summary : कंगना रनौत ने चिराग पासवान के साथ अफेयर की अफवाहों को खारिज किया और मजाकिया अंदाज में कहा कि अब तक उनके बच्चे हो गए होते। उन्होंने मोदी की प्रशंसा की और राहुल गांधी पर टिप्पणी की।

Web Title : Kangana Ranaut Denies Chirag Paswan Affair, Jokes About Having Children

Web Summary : Kangana Ranaut addressed rumors of an affair with Chirag Paswan, humorously stating they would have children by now. She praised Modi and commented on Rahul Gandhi.