Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 17:26 IST2026-04-16T17:24:46+5:302026-04-16T17:26:02+5:30

Vastu Shastra: घराला घरपण नसेल तर घरात पाय टिकणार नाहीत, ती शांतता, सुरक्षितता, आपुलकी मिळावी आणि कायम राहावी यासाठी वास्तू उपाय जाणून घ्या. 

Vastu Tips: Feeling uneasy as soon as you step into your home? Learn the signs and remedies to identify negative energy! | Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!

Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!

तुमच्या घराची ऊर्जा तुमच्या मनस्थितीवर आणि प्रगतीवर खोलवर परिणाम करत असते. अनेकदा घर दिसायला सुंदर असूनही तिथे राहताना जडपणा किंवा अस्वस्थता जाणवते. घरामध्ये नकारात्मक ऊर्जा (Negative Energy) असल्याची १५ प्रमुख लक्षणे आणि ती दूर करण्याचे उपाय जाणून घेऊ. 

हे ही वाचा : चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!

घर ही एक अशी जागा असायला हवी जिथे आपल्याला सुरक्षित आणि प्रसन्न वाटते. पण कधीकधी काही कारणांमुळे घरात नकारात्मकतेचा साठा होतो. ही ऊर्जा केवळ तुमच्या मानसिक शांतीलाच नाही, तर आरोग्यालाही हानी पोहोचवू शकते.

नकारात्मक ऊर्जा असल्याची प्रमुख लक्षणे:

१. विश्रांती घेण्यास अडचण: घरात असूनही मन शांत न होणे किंवा सतत तणाव जाणवणे.
२. कामात लक्ष न लागणे: घरामध्ये काम करताना एकाग्रता कमी होणे किंवा उत्साह न वाटणे. 
३. सततची अस्वस्थता: विनाकारण भीती वाटणे किंवा घराबाहेर गेल्यावर जास्त चांगले वाटणे.
४. झोपेच्या समस्या: पुरेशी झोप घेऊनही थकवा जाणवणे किंवा सतत भयानक स्वप्ने पडणे.
५. कौटुंबिक वाद: घरात किरकोळ कारणावरून वारंवार भांडणे किंवा चिडचिड होणे.
६. सततचा थकवा: घरात पाऊल ठेवताच ऊर्जेची कमतरता जाणवणे आणि सुस्त वाटणे.
७. विचित्र अनुभव: घराच्या ठराविक कोपऱ्यात अस्वस्थ वाटणे, विचित्र आवाज येणे किंवा सावल्या दिसल्याचा भास होणे.
८. वारंवार होणारे अपघात: घरातील वस्तू सतत फुटणे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे बिघडणे किंवा किरकोळ दुखापती होणे.
९. निर्णय घेण्यास अडचण: घरामध्ये असताना गोंधळल्यासारखे वाटणे आणि साधे निर्णय घेतानाही द्विधा मनस्थिती होणे.
१०. पसारा आणि अस्वच्छता: सतत घर आवरूनही पुन्हा पसारा होणे किंवा घर आवरण्याची इच्छाच न होणे.

ही लक्षणं कमी जास्त प्रमाणात तुम्हाला तुमच्या घरात जाणवत असतील तर तिथे नकारात्मक ऊर्जा भरली आहे हे लक्षात घेतले पाहिजे. आता ती ऊर्जा दूर करण्याचे उपायही जाणून घेऊ. 

हे ही वाचा : Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय

नकारात्मकता दूर करण्याचे प्रभावी उपाय:

डिक्ल्टरिंग (Decluttering): वापरात नसलेल्या जुन्या वस्तू, तुटलेली भांडी किंवा बंद पडलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे त्वरित घरातून काढून टाका. पसारा हा नकारात्मक ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत आहे.

हवा आणि प्रकाश: घरातील खिडक्या उघड्या ठेवा. सूर्यप्रकाश आणि ताज्या हवेमुळे घरातील जडपणा कमी होऊन सकारात्मकता वाढते.

मिठाचा वापर: आठवड्यातून एकदा लादी पुसण्याच्या पाण्यात थोडे खडे मीठ टाका. मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचे काम करते.

धूप किंवा अगरबत्ती: घरात भीमसेनी कापूर, लोबान किंवा चंदनयुक्त धूप जाळा. नैसर्गिक सुवासामुळे मनाला शांतता लाभते.

निसर्गाची सोबत: घरामध्ये जिवंत रोपे (Indoor Plants) लावा. झाडे घरातील ऑक्सिजन वाढवतात आणि दूषित ऊर्जा शुद्ध करतात.

ध्यानधारणा (Meditation): घरामध्ये दररोज किमान १०-१५ मिनिटे ध्यान किंवा प्रार्थना करा. यामुळे घरातील वातावरणात उच्च लहरी (High Vibrations) निर्माण होतात.

Web Title : वास्तु टिप्स: घर से नकारात्मक ऊर्जा को पहचानें और दूर करें।

Web Summary : घर में बेचैनी महसूस हो रही है? नकारात्मक ऊर्जा के संकेतों और समाधानों को पहचानें। सकारात्मक वातावरण बनाने के लिए घर को साफ करें, प्रकाश बढ़ाएं, नमक का उपयोग करें, धूप जलाएं, पौधे लगाएं और ध्यान करें।

Web Title : Vastu Tips: Recognize and eliminate negative energy from your home.

Web Summary : Feeling uneasy at home? Identify negative energy signs and solutions. Declutter, increase light, use salt, burn incense, add plants, and meditate to create a positive environment.