Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 16:58 IST2026-04-16T10:14:47+5:302026-04-16T16:58:01+5:30

मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये झालेल्या ड्रग्ज पार्टी प्रकरण, अमेरिका- इराण युद्धाची सद्य परिस्थिती आणि महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे ...

maharashtra marathi news live updates 16 April 2026 nesco drug case us iran talks israel stand on war strait of hormuz Donald Trump PM Narendra Modi CM Devendra Fadnavis IPL 2026 Ashok Kharat Crime case Fuel Prices BJP CM in Bihar samrat choudhary | Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य

Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य

मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये झालेल्या ड्रग्ज पार्टी प्रकरण, अमेरिका-इराण युद्धाची सद्य परिस्थिती आणि महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स

LIVE

Get Latest Updates

16 Apr, 26 : 05:33 PM

नागपूर महापालिकेत MIM-मुस्लिम लीगमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

नागपूर महानगरपालिकेत प्रथमच सहा जागा जिंकून इतिहास घडवणाऱ्या एमआयएममध्ये स्वीकृत सदस्याच्या निवडीवरून अक्षरशः राडा झाला आहे. एमआयएम आणि मुस्लिम लीगच्या युतीला मिळणारी हक्काची एक जागा अंतर्गत कलह आणि गटबाजीमुळे धोक्यात आली असून, अखेर अर्ज भरण्याची मुदत संपल्याने दोन्ही पक्षांना या संधीवर पाणी सोडावे लागले आहे.

16 Apr, 26 : 05:15 PM

महाराष्ट्रात बोगस कॉल सेंटरमध्ये ३ बड्या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश - काँग्रेस

महाराष्ट्रात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सगळीकडे जोरात सुरु असून ‘जामतारा’ रॅकेट यासाठी कुप्रसिद्ध आहे. पण ‘जामतारा’ प्रमाणेच महाराष्ट्रातही अशा बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून जगभरातील नागरिकांना फसवून शेकडो कोटी रुपयांचा गोरखधंदा सुरु आहे. या प्रकरणात आयपीएस अधिकारी दत्ता कराळे व दोन पोलीस अधिक्षक यांचाही सहभाग असल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. या रॅकेटला मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरचा आशिर्वाद असल्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस कॉल सेंटर आणि पैशांची हेराफेरी शक्यच नाही असा आरोप सपकाळ यांनी केला. 

16 Apr, 26 : 04:07 PM

नांदेडमध्ये दुर्दैवी घटना; नाल्यात बुडून चार शाळकरी मुलांचा मृत्यू

नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. नाल्याच्या पाण्यात बुडून चार शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे. आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. देगलूर नाका परिसरातील इस्लामपुरा भागातील ही मुलं शाळा सुटल्यानंतर घरी जात होती.

16 Apr, 26 : 04:01 PM

हा एक व्यापक व राष्ट्रीय एकात्मेसाठी महत्त्वाचा मुद्दा, उद्धव ठाकरे काय म्हणाले?

महिला आरक्षण विधेयकावर सध्या राजकीय गदारोळ सुरू आहे. यात शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. २०२३ साली महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर झाले आहेच, त्यानुसार ३३ टक्के महिला आरक्षण तात्काळ लागू करा. मतदार संघ पुनर्रचना म्हणजे Delimition या विषयाला तूर्त ब्रेक लागला पाहिजे. हा एक व्यापक व राष्ट्रीय एकात्मेसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे, आमच्यासाठी हा एखाद्या पक्षाच्या राजकीय भविष्याचा विषय नसून देशाच्या भविष्याचा विषय आहे. म्हणूनच त्यावर अधिक चर्चा आणि संशोधन होणे आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. 

16 Apr, 26 : 03:27 PM

बुलढाणा : वारकरी धर्मरक्षक परिषदेचा तहसीलवर धडक मोर्चा; मागण्या न मानल्यास मंत्रालयाला घेरावाचा इशारा

वारकरी संप्रदायातील विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी खामगाव येथे वारकरी धर्मरक्षक परिषदेच्या वतीने तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.या आंदोलनाद्वारे वारकऱ्यांच्या हक्काच्या मागण्यांसाठी आवाज उठवण्यात आला असून, मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.​ या आंदोलनाच्या माध्यमातून मानधनाची अट रद्द करा,शासनाने वारकरी मानधनासाठी लावलेली ५० वर्षे वयाची अट त्वरित रद्द करावी,सर्व महिला भजनी मंडळांना वार्षिक २५,००० रुपये अनुदान मिळावे, महिला मंडळातील सदस्यांना वैयक्तिक रित्या दरमहा ५,००० रुपये मानधन सुरू करावे, अशी मागणी केली आहे.

16 Apr, 26 : 03:12 PM

आपण सर्व मिळून देशाला नवी दिशा देतोय - नरेंद्र मोदी

महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे आहे. आपण सर्व मिळून देशाला नवी दिशा देतोय. देशासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. २५-३० वर्षापूर्वीच हे व्हायला हवे होते. सर्व खासदारांनी नारीशक्ती विधेयकाला पाठिंबा द्यावा. या विधेयकाला खासगीत कुणीही विरोध दर्शवला नाही. परंतु जेव्हा ते एकत्र आले तेव्हा विरोध करायला लागले. केवळ एक पक्ष वगळता माझी सगळ्यांची चर्चा झाली - पंतप्रधान नरेंद्र मोदी

16 Apr, 26 : 02:57 PM

आखाती युद्धाचा परिणाम: यवतमाळात सोन्याचे दर गगनाला

यवतमाळ आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता थेट यवतमाळ जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांवर दिसून येत आहे. विशेषतः लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात झालेल्या प्रचंड वाढीमुळे सोने खरेदी करणाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

16 Apr, 26 : 01:45 PM

मोहम्मद अय्याज याला पायदळी तुडवला पाहिजे - बच्चू कडू

मोहम्मद अय्याज याला पायदळी तुडवला पाहिजे. त्याचा चौरंगा केला पाहिजे. मोहम्मद या नावाला इस्लाममध्ये पवित्र स्थान आहे. याला असं नाव दिलं गेलं होतं, त्याने अपवित्र घटना केली. त्याला तुडवणं गरजेचं आहे. त्यासाठी कुठलाही पक्ष मतभेद न ठेवता एकत्र येऊन कारवाई झाली पाहिजे. कारवाई झाली नाही तर पंधरा दिवसात तीव्र आंदोलन करू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. 

16 Apr, 26 : 01:33 PM

मंत्री मुश्रीफ जिल्ह्यात भाजप संपवण्याचे काम करीत आहेत : आमदार शिवाजीराव पाटील

मंत्री हसन मुश्रीफ यांनी 'काँग्रेस'शी हातमिळवणी करून जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप व शिंदेसेनेचे उमेदवार पाडले. महायुती सरकारमध्ये राहून, सरकारचे संरक्षण घेवून ते जिल्ह्यातील भाजप संपविण्याचे काम करीत आहेत. 'युतीधर्म' म्हणून दीडवर्ष सहन करीत आहोत. परंतु, ते खातात ‘महायुती’च आणि गाणं गातात  ‘महाविकास’चं आघाडीचं, असा घणाघाती आरोप चंदगड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी येथील पत्रकार परिषदेत केला.

16 Apr, 26 : 12:44 PM

लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान

लोकसभेत तीन विधेयकांवर चर्चा सुरू झाली आहे. बाजूने २५१ मते पडल्यानंतर ही चर्चा सुरू झाली. भाजपचे प्रतिनिधित्व करणारे अर्जुन राम मेघवाल यांनी चर्चेला सुरुवात केली. या विधेयकावर उद्या दुपारी ४ वाजता मतदान होणार आहे.

16 Apr, 26 : 11:48 AM

'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट

अंकशास्त्रामध्ये निष्णात असल्याचा दावा करणारा भोंदू अशोक खरात स्वतः साठी ९ हा शुभांक समजायचा, त्यामुळेच त्याच्या दोन्ही मोटारींसाठी त्याने आरटीओमधून त्याच प्रकारचे 'चॉइस' क्रमांक घेतल्याचं तपासात पुढे आलं आहे. खरात याने अंकशास्त्र व भविष्य याचा दावा करत अनेकांना गंडा घालण्यासह महिलांचं लैंगिक शोषण केल्याने सध्या त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र आता अंकाचा खेळ खरात याच्यावरच उलटला आहे. वाचा सविस्तर

16 Apr, 26 : 11:28 AM

केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ

केंद्रीय कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत सीमांकन विधेयक सादर केले. यावर काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी आक्षेप घेतला. या विधेयकाला विरोध होत असल्याने सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली आणि सभागृहात गदारोळ झाला.

16 Apr, 26 : 11:24 AM

बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने तिरूपतीच्या तिरुमला मंदिरात केलं पूजन

आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील तिरुमला मंदिरात भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने आशीर्वाद घेतले. तिने भगवान वेंकटेश्वरांचे पूजन करून आशीर्वाद घेतले. सिंधुच्या या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तिच्या आगामी स्पर्धांसाठी तिने प्रार्थना केल्याचेही सांगितले जात आहे.

16 Apr, 26 : 10:45 AM

महिला आरक्षण विधेयकावर संजय राऊत काय म्हणाले?

16 Apr, 26 : 10:42 AM

मालाडमध्ये भोंदूगिरीचं प्रकरण उघडकीस...

मालाड येथे एक भोंदूबाबा तंत्रमंत्र करत असून त्याचा स्थानिक रहिवाशांना त्रास होत असल्याची तक्रार संबंधित परिसरातील नागरिकांनी पोलिसांना दिली आहे. या बाबाकडे मुंबईतून अनेक जण दर रविवारी आणि गुरुवारी गर्दी करतात. जवळच्याच एका पालिकेच्या मैदानात हे तंत्रमंत्र सुरू असतात अशी तक्रार स्थानिकांनी दिली आहे. 

16 Apr, 26 : 10:18 AM

नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन

गोरेगावच्या नेक्सो सेंटरमध्ये झालेल्या ड्रग्ज पार्टी प्रकरणाचं नागपूर कनेक्शन समोर आलं आहे. कॉन्सर्ट आयोजित करणारी कंपनी मूळची नागपूरची असल्याचं सांगितलं जात आहे. या कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हर डोसमुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता.

Web Title: maharashtra marathi news live updates 16 April 2026 nesco drug case us iran talks israel stand on war strait of hormuz Donald Trump PM Narendra Modi CM Devendra Fadnavis IPL 2026 Ashok Kharat Crime case Fuel Prices BJP CM in Bihar samrat choudhary