MCX Gold Silver Price, 16 April 2026: आज १६ एप्रिल २०२६, गुरुवार रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ दिसून येत आहे. देशांतर्गत कमोडिटी मार्केट 'मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया' (MCX) वर सोन्याची किंमत १,५४,७२० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीची किंमत २,५४,४५७ रुपये प्रति किलो झाली आहे. अमेरिका आणि इराण दरम्यान होणाऱ्या शांतता चर्चेच्या पुढील फेरीच्या वृत्तामुळे ही दरवाढ झाल्याचं मानलं जात आहे. तसंच डॉलरचा कमकुवतपणा देखील एमसीएक्सवर सोने-चांदीच्या किमती वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. अक्षय्य तृतीयेचा सण जवळ येत असतानाच सोने-चांदी सातत्यानं महाग होत आहे.
सोन्या-चांदीच्या दरात किती वाढ झाली?
बुधवारी एमसीएक्सवर सोन्याचा दर १,५३,९९८ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा दर २,५१,५०५ रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. म्हणजेच कालच्या बंद भावाच्या तुलनेत आज सोन्यात ७२२ रुपयांनी तर चांदीत २,९५२ रुपयांनी वाढ झाली आहे.
अक्षय्य तृतीया २०२६
यावर्षी १९ एप्रिल २०२६ रोजी अक्षय्य तृतीया आहे. भारतात या मुहूर्तावर सोने-चांदीसारख्या धातूंची खरेदी करण्याची प्रथा आहे. हा दिवस अत्यंत शुभ मानला जात असल्यानं या दिवशी सुरू केलेली कामं यशस्वी होतात, अशी धारणा आहे.
भारतातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर
- दिल्ली: २४ कॅरेट सोन्याचा दर १,५५,७२० रुपये, २२ कॅरेटसाठी १,४२,७५० रुपये आणि १८ कॅरेटसाठी १,१६,८३० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
- मुंबई: २४ कॅरेट सोन्याचा दर १,५५,५७० रुपये, २२ कॅरेटसाठी १,४२,६०० रुपये आणि १८ कॅरेटसाठी १,१६,६८० रुपये प्रति १० ग्रॅम झालाय.
- बंगळुरू: २४ कॅरेटचा भाव १,५५,५७० रुपये, २२ कॅरेटचा १,४२,६०० रुपये आणि १८ कॅरेटचा १,१६,६८० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.
- चेन्नई: २४ कॅरेट सोन्याची किंमत १,५६,२३० रुपये, २२ कॅरेटसाठी १,४३,२१० रुपये आणि १८ कॅरेटसाठी १,१९,४१० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
- कोलकाता: २४ कॅरेटचा दर १,५५,५७० रुपये, २२ कॅरेटसाठी १,४२,६०० रुपये आणि १८ कॅरेटसाठी १,१६,६८० रुपये प्रति १० ग्रॅम झालाय.
चांदीचा ताजा भाव
दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि कोलकाता येथे आज चांदीचा भाव २,७०,१०० रुपये प्रति किलो आहे. चेन्नईमध्ये मात्र चांदीची किंमत २,७५,१०० रुपये प्रति किलोवर पोहोचली.
