Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी

Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी

Share Market Today: शेअर बाजारासाठी १६ एप्रिलची सकाळ अत्यंत शुभ ठरली आहे. जागतिक बाजारपेठेतील मजबुती आणि भू-राजकीय तणाव कमी झाल्याच्या बातम्यांमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीनं आज शानदार वाढीसह सत्राची सुरुवात केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 10:14 IST2026-04-16T10:14:08+5:302026-04-16T10:14:08+5:30

Share Market Today: शेअर बाजारासाठी १६ एप्रिलची सकाळ अत्यंत शुभ ठरली आहे. जागतिक बाजारपेठेतील मजबुती आणि भू-राजकीय तणाव कमी झाल्याच्या बातम्यांमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीनं आज शानदार वाढीसह सत्राची सुरुवात केली.

Share Market Today starts with a bullish start Sensex up 400 points Nifty up 150 points these stocks up | Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी

Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी

Share Market Today: शेअर बाजारासाठी १६ एप्रिलची सकाळ अत्यंत शुभ ठरली आहे. जागतिक बाजारपेठेतील मजबुती आणि भू-राजकीय तणाव कमी झाल्याच्या बातम्यांमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीनं आज शानदार वाढीसह सत्राची सुरुवात केली. बीएसई सेन्सेक्स ५६५.१८ अंकांच्या (०.७२%) वाढीसह ७८,६७६.४२ च्या पातळीवर उघडला. तर, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (NSE) निफ्टी १५६.२० अंकांनी (०.६४%) वधारून २४,३८७.५० च्या पातळीवर पोहोचला.

बाजारात चौफेर तेजीचे वातावरण

आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात 'ॲडव्हान्स-डिक्लाईन' रेश्यो अतिशय मजबूत दिसले. सुमारे २,५३० शेअर्समध्ये तेजी दिसून आली, तर केवळ ४८७ शेअर्समध्ये घसरण झाली. तसंच १०८ शेअर्स त्यांच्या जुन्या पातळीवरच स्थिर राहिले. ही आकडेवारी बाजारात खरेदीचं वातावरण मोठ्या प्रमाणावर पसरल्याचे दर्शवते.

पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन

आयटी आणि मेटल सेक्टरमध्ये चमक

फार्मा सेक्टर वगळता आज सर्व क्षेत्रीय निर्देशांक ग्रीन झोनमध्ये म्हणजेच वाढीसह व्यवहार करत आहेत. आयटी, रियल्टी, मेटल आणि मीडिया सेक्टरमध्ये सर्वाधिक उत्साह असून हे सर्व १% च्या वाढीसह ट्रेड करत आहेत. निफ्टीवर वाढ नोंदवणाऱ्या प्रमुख शेअर्समध्ये इन्फोसिस, बजाज फायनान्स, टेक महिंद्रा आणि हिंदाल्को यांचा समावेश आहे. दुसरीकडे, ओएनजीसी, नेस्ले, सन फार्मा आणि अल्ट्राटेक सिमेंट यांसारख्या शेअर्समध्ये किरकोळ घसरण दिसून आली.

तिमाही निकालांमुळे 'या' कंपन्यांवर असेल लक्ष

आजचा दिवस कॉर्पोरेट जगतासाठीही महत्त्वाचा आहे, कारण अनेक दिग्गज कंपन्या आपल्या तिमाही निकालांची घोषणा करणार आहेत. यामध्ये विप्रो (Wipro), एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स, एचडीएफसी एएमसी, एंजेल वन आणि क्रिसिल (CRISIL) यांचा समावेश आहे. याशिवाय, आलोक इंडस्ट्रीज आणि वारी रिन्यूएबल यांसारख्या कंपन्यांच्या आर्थिक कामगिरीवरही गुंतवणूकदारांची नजर असेल.

गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे संकेत

तज्ज्ञांच्या मते, अमेरिका आणि इराणमधील शांतता कराराच्या आशेमुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि बाजारातील अस्थिरता कमी झाली आहे. मात्र, तिमाही निकालांमुळे वैयक्तिक शेअर्समध्ये चढ-उतार पाहायला मिळू शकतो.

Web Title : शेयर बाजार में उछाल: सेंसेक्स 400 अंक ऊपर, निफ्टी में भी तेजी

Web Summary : भारतीय शेयर बाजार मजबूत खुला! वैश्विक संकेतों और भू-राजनीतिक तनाव में कमी से सेंसेक्स 400 अंक, निफ्टी 150 अंक ऊपर। आईटी, धातु क्षेत्र आगे। विप्रो, एचडीएफसी लाइफ के तिमाही नतीजों पर निवेशकों की नजर। शांति की उम्मीदों से तेल, अस्थिरता में कमी।

Web Title : Stock Market Soars: Sensex Jumps 400 Points, Nifty Up Too

Web Summary : Indian stock market opens strong! Sensex surges 400 points, Nifty gains 150, fueled by global cues and easing geopolitical tensions. IT, metal sectors lead. Investors eye quarterly results from Wipro, HDFC Life, others. Peace hopes calm oil, volatility.