दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 14:49 IST2026-04-16T14:42:14+5:302026-04-16T14:49:26+5:30
Amir Hamza: लश्कर-ए-तोयबाचा संस्थापक सदस्य आणि दहशतवादी हाफिज सईदच्या जवळचा व्यक्ती असलेल्या अमीर हमजावर गोळ्या झाडण्यात आल्या. लाहौरमध्ये ही घटना घडली.

दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
Amir Hamza shot Lahore: लश्कर ए तोयबाचा संस्थापक सदस्य असलेला अमीर हमजावर गोळ्या झाडण्यात आल्याची घटना घडली आहे. लाहौरमध्ये अज्ञात व्यक्तीने अमीर हमजावर गोळीबार केला. एका न्यूज चॅनेलच्या कार्यालयाबाहेरच ही घटना घडली आहे.
लाहौर पाकिस्तानातील पंजाब प्रांताची राजधानी आहे. अमीर हमजाला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. अमीर हमजा हा दहशतवादी हाफिज सईद यांचा जवळचा साथीदार असून, लश्कर ए तोयबाचा संघटन वाढवण्यासाठी काम करतो.
लश्कर ए तोयबाचा मेंदू
अमीर हमजा हा लश्कर ए तोयबाचा राजकीय मेंदू म्हणून ओळखले जाते. या दहशतवादी संघटनेची सुरुवात करणाऱ्या दहशतवाद्यांपैकी तो एक आहे. अमीर हमजा तरुणांचे ब्रेनवॉश करायचा. त्याला अमेरिकेने दहशतवादी म्हणून घोषित केलेले आहे.
या दहशतवादी संघटनेसाठी पैसे गोळा करण्याचे काम, तरुणांना दहशतवादी संघटनेत भरती करण्याचे आणि पकडल्या गेलेल्या दहशतवाद्यांना सोडवण्यासाठी सरकारांना वेठीस धरण्याचे काम तो करतो. सध्या त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.