"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 16:07 IST2026-04-16T16:02:25+5:302026-04-16T16:07:36+5:30

नाशिक TCS बीपीओ छळ प्रकरण: महिला एचआरवर गंभीर आरोप

Nashik TCS Case "Such things happen..." The young woman who endured harassment was caught by female TCS officers! | "अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!

"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!

नाशिकमधील 'टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस'शी संबंधित असलेल्या बीपीओ युनिटमध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या छळाचे आणि सक्तीच्या धर्मांतराचे जे गंभीर प्रकरण समोर आले आहे, त्यात आता अत्यंत संतापजनक माहिती उघड झाली आहे. छळवणूक सहन करणाऱ्या पीडित तरुणीला न्याय मिळवून देण्याऐवजी, तिथल्या महिला एचआर आणि ऑपरेशन्स हेडने "अशा गोष्टी तर घडतच असतात" असे म्हणत आरोपींची पाठराखण केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

महिला बॉसचाच आरोपींना पाठिंबा?

नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील दोन महिला आरोपींनी पीडित तरुणीला तक्रार करण्यापासून परावृत्त केले होते. "ऑफिसमध्ये असे प्रकार होतच असतात, ते गांभीर्याने घेऊ नकोस," असा सल्ला देऊन त्यांनी पीडितेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सात पुरुष आणि एका महिला मॅनेजरसह एकूण ८ जणांना अटक केली असून एक महिला आरोपी अजूनही फरार आहे.

धर्मांतर आणि संघटित छळाचे जाळे

या बीपीओ युनिटमध्ये वरिष्ठ पदावर असलेले पुरुष कर्मचारी संगनमताने महिला कर्मचाऱ्यांना लक्ष्य करत होते. केवळ लैंगिक छळच नाही, तर एका पुरुष कर्मचाऱ्याने त्याच्यावर सक्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रारही दिली आहे. या प्रकरणी एकूण ९ गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन केले आहे.

तपासात मोठी वळणे; NIA आणि ATSची मदत

या प्रकरणाचे धागेदोरे एखाद्या कट्टरपंथी संघटनेशी किंवा परकीय निधीशी जोडलेले आहेत का, याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी SID, ATS आणि NIA यांसारख्या यंत्रणांची मदत मागितली आहे. अटकेत असलेल्या पुरुषांमध्ये दानिश शेख, तौसीफ अत्तार, रझा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख, आसिफ अन्सारी आणि शाहरुख शेख यांचा समावेश आहे.

टाटा सन्सकडून गंभीर दखल

टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी या घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. हे प्रकरण अत्यंत त्रासदायक असून याची सखोल चौकशी करण्यासाठी टीसीएसच्या सीयओओ आरती सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असे आश्वासन कंपनीकडून देण्यात आले आहे.

Web Title : टीसीएस उत्पीड़न मामला: महिला अधिकारियों ने आरोपियों को बचाया, पीड़िता चुप कराई गई।

Web Summary : नासिक के टीसीएस बीपीओ इकाई में, उत्पीड़न पीड़िता को एचआर द्वारा चुप कराया गया। महिला अधिकारियों ने उसकी शिकायतों को खारिज कर दिया, आरोपियों की रक्षा की। पुलिस ने जबरन धर्मांतरण और दुर्व्यवहार के मामले में एक प्रबंधक सहित आठ लोगों को गिरफ्तार किया। टाटा संस ने जांच और जवाबदेही का आश्वासन दिया। एनआईए और एटीएस जांच में सहायता कर रहे हैं।

Web Title : TCS harassment case: Women officers shielded accused, victim silenced.

Web Summary : In Nashik's TCS BPO unit, a harassment victim was silenced by HR. Female bosses dismissed her complaints, protecting the accused. Police arrested eight, including a manager, in the forced conversion and abuse case. Tata Sons assures investigation and accountability. NIA and ATS are assisting in the investigation.