"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 15:57 IST2026-04-16T15:53:47+5:302026-04-16T15:57:26+5:30

TCS Nashik Crime Case: या अत्याचाराची सुरुवात २०२२ मध्ये झाली होती. त्यावेळी पीडित पुरुषाला कंपनीत नुकतीच नोकरी लागली होती. तेव्हा त्याचा टीम लीडर तौसिफ अख्तरने सहकारी दानिश शेखसोबत मिळून त्याचा छळ सुरू केला.

"If you want a baby, send your wife to me..."; THE Gang that pressured for conversion torture to men employee | "बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ

"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ

नाशिक- TCS कंपनीत धर्मांतर आणि लैंगिक अत्याचाराचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या घटनेतील पीडित एक एक करत समोर यताहेत. पीडितांमध्ये सर्वाधिक महिलांचा समावेश आहे ज्यांच्यावर लैंगिक अत्याचार आणि जबरदस्तीने धर्मांतराचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेत एक पुरुष कर्मचारीही पुढे येऊन गंभीर आरोप करत आहे. या पुरुषाला बळजबरी टोपी घालण्यात आली आणि नमाज पठण करण्यासाठी त्याला भाग पाडले. इतकेच नाही तर जर तुला बाळ हवं तर बायकोला माझ्याकडे पाठव असंही एका आरोपीने त्याला म्हटल्याचा दावा पीडित पुरुष कर्मचाऱ्याने केला आहे.

एका मुलाखतीत या पीडित पुरुषाने म्हटलं की, माझ्या टीम लीडरने मला नमाज आणि कलमा पठण करण्यास सांगितले. त्याने मला टोपी घालण्यास भाग पाडले. या छळाने तेव्हा परिसीमा गाठली जेव्हा आरोपीने त्याच्या खासगी आयुष्याची खिल्ली उडवली. जर तुला उपचारानंतरही बाळ होत नसेल तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव असं त्याला सांगण्यात आले. या अत्याचाराची सुरुवात २०२२ मध्ये झाली होती. त्यावेळी पीडित पुरुषाला कंपनीत नुकतीच नोकरी लागला होता. तेव्हा त्याचा टीम लीडर तौसिफ अख्तरने सहकारी दानिश शेखसोबत मिळून त्याचा छळ सुरू केला. हे दोघे अतिरिक्त कामासाठीही प्रेशर करायचे असं त्याने आरोप केला.

तौसिफ, दानिशवरही गुन्हे दाखल

एका २३ वर्षीय युवतीने दाखल केलेल्या गुन्ह्यात तौसिफ आणि दानिश यांचीही नावे FIR मध्ये समाविष्ट आहेत. दानिशने तिला बळजबरीने जवळ ओढत किस करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तिला लग्नासाठी मागणी केली. दानिशचा मित्र तौसिफ आणि एचआर निदा खान यांनी देवी देवतांबाबत आक्षेपार्ह विधाने केली होती. या घटनेच्या तपासासाठी एका महिला पोलीस अधिकाऱ्याला सीक्रेट एजेन्ट बनून कंपनीत पाठवण्यात आले होते. या प्रकरणात अटक केलेल्यांमध्ये ५ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे. अनेक महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर या घटनेत एकूण ९ गुन्हे आरोपींविरोधात नोंदवले आहेत.

दरम्यान, मी कट्टर शाकाहारी आहे मात्र नाइट शिफ्टच्यावेळी मला हॉटेलला घेऊन जात मला मांसाहार करण्यासाठी दबाव आणला गेला. मी नकार दिला तेव्हा माझ्यावर विनोद केले असंही पीडित पुरुषाने सांगितले. तौसिफने पीडित कर्मचाऱ्याला त्याच्या घरी नेले होते. तिथे त्याला धार्मिक टोपी घालून नमाज पठण करायला लावले आणि फोटो काढून ऑफिसच्या ग्रुपवर बदनाम केले. जेव्हा या गोष्टीचा जाब विचारायला गेला तेव्हा तौसिफने टेबल फॅन त्याच्या अंगावर फेकला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. 

इस्लाम स्वीकार, वडील ठीक होतील...

माझे वडील जेव्हा लकवाग्रस्त झाले होते तेव्हा तौसिफ, दानिश, शाहरूख आणि रजा मेनन या लोकांनी मला इस्लाम स्वीकार तुझे वडील ठीक होतील असं सांगितले. मी त्यांचे ऐकले नाही तेव्हा मला नोकरीवरून काढण्याचा कट रचला. मुख्य ऑफिसला खोट्या तक्रारी दिल्या असंही पीडित पुरुष कर्मचाऱ्याने सांगितले. 

Web Title : TCS नाशिक: कंपनी में जबरन धर्मांतरण, यौन उत्पीड़न का खुलासा।

Web Summary : TCS नाशिक के कर्मचारियों को जबरन धर्मांतरण के प्रयास, यौन उत्पीड़न और धार्मिक दबाव का सामना करना पड़ा। एक पुरुष कर्मचारी को टोपी पहनने, प्रार्थना करने और परेशान करने वाली व्यक्तिगत टिप्पणियों को सहने के लिए मजबूर किया गया। पीड़ितों ने दबाव, धमकियों और भेदभाव का विवरण दिया, जिससे कई गिरफ्तारियां और जांच हुईं।

Web Title : TCS Nashik: Forced conversion, sexual harassment in company exposed.

Web Summary : TCS Nashik employees faced forced conversion attempts, sexual harassment, and religious coercion. A male employee was forced to wear a cap, recite prayers, and endure disturbing personal remarks. Victims detail pressure, threats, and discrimination, leading to multiple arrests and investigations.