चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 16:39 IST2026-04-15T16:39:03+5:302026-04-15T16:39:45+5:30

Hormuz Strait Blockade: अमेरिकेच्या निर्बंधांखालील 'रिच स्टॅरी' टँकरला होर्मुजची सामुद्रधुनी ओलांडताना अमेरिकेने रोखले.

Hormuz Strait Blockade: Chinese tanker Rich Starry set out to exit Hormuz, turned back upon seeing US warship... | चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...

चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...

इराणशी संबंधित असलेल्या आणि अमेरिकेच्या निर्बंधांच्या विळख्यात अडकलेल्या 'रिच स्टॅरी' या तेलवाहू टँकरला सलग दुसऱ्या दिवशी होर्मुजची सामुद्रधुनी ओलांडण्यात अपयश आले आहे. बुधवारी या टँकरने अमेरिकेची नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र वाढत्या दबावामुळे त्याला पुन्हा माघारी फिरावे लागले.

संयुक्त अरब अमिरातीच्या हमरियाह बंदरातून सुमारे २.५ लाख बॅरल मिथेनॉल घेऊन निघालेला हा टँकर खाडीबाहेर पडण्याच्या प्रयत्नात होता. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी देखील अमेरिकन युद्धनौकांनी चाबहार बंदरातून बाहेर पडणाऱ्या दोन टँकरची वाट रोखली होती, ज्यात 'रिच स्टॅरी'चा समावेश होता.

निर्बंधांचा फास अधिक घट्ट
'रिच स्टॅरी' आणि त्याची मालक कंपनी 'शांघाय जुआनराॅन शिपिंग'वर २०२३ पासून अमेरिकेचे निर्बंध आहेत. दरम्यान, अमेरिकन ट्रेझरी विभागाने स्पष्ट केले आहे की, इराणला तेल विक्रीसाठी देण्यात आलेली तात्पुरती सवलत आता संपणार असून ती वाढवली जाणार नाही. यामुळे इराणच्या तेल व्यापारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडींचा वेग
होर्मुजमधील वाहतूक सुरळीत करण्यासाठी युरोपीय देश एका मोठ्या आंतरराष्ट्रीय युतीची योजना आखत आहेत. विशेष म्हणजे, या मिशनमध्ये अमेरिकेला स्थान देण्यात आलेले नाही. युद्धाच्या झळा सोसणाऱ्या लेबनॉनसाठी कॅनडाने ४० दशलक्ष डॉलर्सच्या (सुमारे ३३० कोटी रुपये) मदतीची घोषणा केली आहे. गेल्या २४ तासांत हिजबुल्लाहने इस्रायलच्या लष्करी तळांवर ३४ मोठे हल्ले केल्याचा दावा केला आहे.

ट्रम्प यांचे मोठे विधान
एकीकडे तणाव वाढत असतानाच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतची चर्चा पुढील २ दिवसांत पुन्हा सुरू होऊ शकते, असे संकेत दिले आहेत. यामुळे जगाचे लक्ष आता या चर्चेकडे लागले आहे.

Web Title : अमेरिकी युद्धपोतों को देखकर होर्मुज से लौटा चीनी टैंकर

Web Summary : अमेरिकी प्रतिबंधों के तहत चीनी टैंकर होर्मुज जलडमरूमध्य पार करने में विफल रहा। अमेरिका ईरान के तेल बिक्री छूट को खत्म कर रहा है, जिससे व्यापार प्रभावित होगा। यूरोपीय देश अमेरिका के बिना होर्मुज सुरक्षा गठबंधन की योजना बना रहे हैं, जबकि ट्रम्प ने ईरान के साथ फिर से बातचीत का संकेत दिया।

Web Title : China Tanker Retreats from Hormuz Amid US Naval Presence

Web Summary : A Chinese tanker, under US sanctions, failed to cross Hormuz Strait for the second day due to American naval pressure. The US is ending Iran's oil sale waivers, impacting its trade. European nations plan a Hormuz security coalition sans the US, while Trump hints at renewed Iran talks.