CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 17:03 IST2026-04-15T16:50:00+5:302026-04-15T17:03:01+5:30

विद्यार्थ्यांकडे आपला निकाल तपासण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत. त्यामुळे अपार आयडी अनिवार्य नाही.

CBSE 10th Result 2026: CBSE 10th board exam results declared; See the results | CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...

AI Generated Image

CBSE 10th Result Live: केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड(CBSE) ने २०२६ मधील १० वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केलेत. हा निकाल अधिकृत वेबसाइट, डिजीलॉकर, उमंग ॲप आणि इतर माध्यमांवरून पाहता येईल. अनेक विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर आपला निकाल पाहता येत नाही. परंतु खालील दिलेल्या सूचना वाचल्या तर तुम्हाला तुमची गुणपत्रिका सहजपणे डाउनलोड करण्यास मदत होईल.

निकाल डाउनलोड करण्याची सोपी पद्धत

सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी results.cbse.nic.in या वेबसाईटला भेट द्यावी.

"माध्यमिक शाळा परीक्षा (इयत्ता १० वी) २०२६" या लिंकवर क्लिक करा.

तुमचा रोल नंबर, शाळा क्रमांक, प्रवेशपत्र आयडी, जन्मतारीख आणि सुरक्षा पिन प्रविष्ट करा.

"सबमिट" वर क्लिक करा.

तुमची गुणपत्रिका स्क्रीनवर दिसेल. 

त्याशिवाय खालील दिलेल्या लिंक्सवर तुम्ही निकाल पाहू शकता.

results.cbse.nic.in
cbse.gov.in
results.nic.in
results.digilocker.gov.in
umang.gov.in

शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपार आयडी हा शिक्षण प्रणालीचा एक महत्त्वाचा भाग असला तरी सीबीएसई दहावीचा निकाल पाहण्यासाठी तो पूर्णपणे अनिवार्य नाही. विद्यार्थ्यांकडे आपला निकाल तपासण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत. त्यामुळे अपार आयडी अनिवार्य नाही.

२ टप्प्यात झाली परीक्षा, दुसरी संधीही मिळणार

यावर्षी CBSE ने दहावीच्या परीक्षा नवीन टू बोर्ड सिस्टमने घेतल्या होत्या. पहिली बोर्ड परीक्षा १७ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२६ या काळात झाली. ती बंधनकारक होती. त्याशिवाय दुसरी बोर्ड परीक्षा जी पर्यायी असून १५ मे ते १ जून २०२६ या कालावधीत ती घेतली जाईल. दुसऱ्या परीक्षेत तेच विद्यार्थी बसू शकतात ज्यांना त्यांचे मार्क्स आणखी चांगले आणायचे आहेत. त्यात कमाल ३ विषयात गुणपत्रिका सुधारण्याची संधी मिळेल. सोबतच २ विषयात नापास झालेल्यांनाही या कॅटेगिरीत ठेवले आहे. परंतु ३ अथवा अधिक विषयात नापास होतील त्यांना २०२७ ला मुख्य परीक्षा द्यावी लागेल.

दरम्यान, सीबीएसईच्या आकडेवारीनुसार यंदाच्या १० वी बोर्डाच्या परीक्षेत एकूण २५ लाख ८ हजार ३१९ विद्यार्थी बसले होते. ज्यात १४ लाख ८ हजार ५६४ मुले तर १० लाख ९९ हजार ७७३ मुलींचा समावेश होता. एकूण ८ हजार ७५ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेतली होती. 

Web Title : CBSE 10वीं का रिज़ल्ट 2026 घोषित: ऐसे देखें अपना स्कोर

Web Summary : CBSE 10वीं का रिज़ल्ट 2026 घोषित हो गया है! आधिकारिक वेबसाइट, डिजिलॉकर या उमंग ऐप के माध्यम से देखें। बोर्ड ने दो चरणों में परीक्षा आयोजित की, स्कोर सुधारने का दूसरा मौका दिया। 25 लाख से अधिक छात्र परीक्षा में शामिल हुए।

Web Title : CBSE 10th Result 2026 Declared: How to Check Your Scores

Web Summary : CBSE 10th results for 2026 are out! Check via official websites, DigiLocker, or Umang app. The board conducted exams in two phases, offering a second chance to improve scores. Over 25 lakh students appeared for the exam.