देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
खातेवाटपाचा निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचा आहे. तिन्ही पक्षांना वाटत आहे की एक विभाग त्यांच्याकडेच असावा. यावरून चर्चा सुरू आहे, असे चव्हाण यांनी सांगितले. ...
अतिक्रमण हटविणाऱ्या नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी माजी महापौर व नगरसेवक प्रवीण दटके यांनी केली. यावरून दटके-गुडधे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. ...
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची अनेक भाषणं आज व्हायरल होत आहेत. त्यात त्यांनी काँग्रेसबद्दल जी मतं मांडली आहेत, ती ऐकल्यावर काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येणं यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं?, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी केला. ...
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणे निश्चित झाले आहे. शुक्रवारी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली, तीत चर्चेअंती आघाडीवर शिक्कामोर्तब झाले. ...