अतिक्रमणाच्या मुद्यावरून दटके-गुडधे यांच्यात खडाजंगी : मनपा सभागृहातून काँग्रेसचा सभात्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 10:23 PM2019-12-07T22:23:42+5:302019-12-07T22:25:27+5:30

अतिक्रमण हटविणाऱ्या नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी माजी महापौर व नगरसेवक प्रवीण दटके यांनी केली. यावरून दटके-गुडधे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.

Confrontation over the issue of encroachment: Congress members from Municipal House | अतिक्रमणाच्या मुद्यावरून दटके-गुडधे यांच्यात खडाजंगी : मनपा सभागृहातून काँग्रेसचा सभात्याग

अतिक्रमणाच्या मुद्यावरून दटके-गुडधे यांच्यात खडाजंगी : मनपा सभागृहातून काँग्रेसचा सभात्याग

Next
ठळक मुद्देहॉकर्स झोनमधील अतिक्रमण हटविण्याला विरोध : सदस्यत्व रद्द करण्याच्या मागणीवरून आव्हान-प्रतिआव्हान

लोकमत न्यूज नटवर्क
नागपूर : नागपूर शहरातील वाढते अतिक्रमण व पार्किंग समस्यावर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शनिवारी आयोजित महापालिकेच्या विशेष सभेत काँग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी हॉकर्स झोन निश्चित करा, त्यानंतरच हॉकर्सवर कारवाई करा, अशी भूमिका घेतली. काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी गुडधे यांच्या भूमिकेचे समर्थन केले तर काँगे्रस पक्षाला या शहरातील अतिक्रमण हटवायचे नाही. अतिक्रमण हटविणाऱ्या नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी माजी महापौर व नगरसेवक प्रवीण दटके यांनी केली. यावरून दटके-गुडधे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी गोंधळ घालून सभात्याग केला, तर भाजपच्या नगरसेवकांनीही प्रत्त्युरादाखल नारेबाजी केली. गोंधळामुळे महापौर संदीप जोशी यांनी सभागृहाचे कामकाज पाच मिनिटासाठी तहकूब केले.
अतिक्रमणावरील चर्चेदरम्यान भाजपचे नगरसेवक प्रकाश भोयर यांनी दक्षिण-पश्चिम नागपुरात अनधिकृ त बाजाराचा मुद्दा उपस्थित केला.
विक्रे त्यांवर कारवाई करण्यासाठी पथक गेले असता प्रफुल्ल गुडधे यांनी कारवाईला विरोध दर्शविल्याचा आरोप केला. यावर गुडधे यांनी आक्षेप घेतला. पथ विक्रेता उपजीविका संरक्षण कायद्यानुसार हॉकर्सला संरक्षण आहे. हॉकर्स झोन निश्चित केलेल्या भागातील विक्रे त्यांवर कारवाई करता येणार नाही, अशी भूमिका मांडली. यावर भाजपचे धरमपाल मेश्राम यांनी अतिक्रमण कारवाईला विरोध करणाऱ्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली. तर प्रवीण दटके यांनी कायद्यात काय म्हटले आहे, याचे सभागृहात वाचन करण्याची मागणी केली. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाची माहिती दिली.
आयुक्त अभिजित बांगर यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १७ सदस्यीय टाऊ न वेडिंग कमिटी गठित केली जाणार आहे. यासाठी १७ डिसेंबरला निवडणूक लावण्यात आल्याची माहिती दिली. कमिटी गठित होण्यापूर्वी हॉकिंग, नॉन हॉकिंग झोनमधील अतिक्रमण काढणे योग्य होणार नाही. जोपर्यंत हॉकर्स झोन निश्चित होणार नाही, तोपर्यंत कारवाई करता येणार नाही, अशी भूमिका गुडधे यांनी मांडली. यावर दटके यांनी आक्षेप घेतला. ज्या भागातील अतिक्रमण हटविण्याला गुडधे यांनी विरोध दर्शविला ते हॉकर्स झोन नसल्याचे निदर्शनास आणले.
अतिक्रमण कारवाईला विरोध करणाऱ्या गुडधे यांचे सदस्यत्वर रद्द करण्याची मागणी केली. यावरून विरोधीपक्षनेते तानाजी वनवे यांच्यासह काँग्रेसचे सदस्य आक्रमक झाले. महापौरांच्या आसनापुढे धाव घेत गोंधळ घालून सभात्याग केला.
अतिक्रमणावरील चर्चेदरम्यान अविनाश ठाकरे म्हणाले, शहरात पार्किंगची सुविधा निर्माण करावी. देशात प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. याचा विचार करता प्रत्येक झोनमध्ये पोलीस स्टेशन अंतर्गत फे रीवाला समिती गठित करण्यात यावी. रस्त्यांवर वाहने उभी राहू नये, यासाठी पार्किंग सुविधा उपलब्ध करावी. भाजपचे डॉ. रवींद्र भोयर यांनी प्रत्येक झोनमध्ये अतिक्रमण पथक गठित करण्याची मागणी केली. संजय बंगाले यांनी शहरातील प्रमुख रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याची सूचना केली. अ‍ॅड. संजय बालपांडे यांनी अतिक्रमण करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करण्याची भूमिका मांडली. काँग्रेसचे पुरुषोत्तम हजारे यांनी पारडी भागातील अतिक्रमण हटविण्याची मागणी केली. चर्चेत स्नेहल बिहारे, नरेद्र वालदे, परसराम मानवटकर, प्रमोद तभाने, संगिता गिऱ्हे, विद्या कन्हेरे, श्रद्धा पाठक, आयशा उईके, शुभदा देशपांडे आदींनी सहभाग घेतला.

रस्ते, सार्वजनिक ठिकाणे अतिक्रमण मुक्त करणार-जोशी
हॉकर्स विरोधात आम्ही मुळीच नाही. त्यांच्या पोटावर पाय देण्याची आमची भूमिका नाही. शहरातील वाढते अतिक्रमण, फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. त्यानुसार शहरातील प्रमुख रस्ते, शासकीय इमारती व सार्वजनिक जागा, घरे यापुढील अतिक्रमण काढण्याची कारवाई तीन दिवसांनी सुरू करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले आहे. यात जे सहभागी होणार त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. असा इशारा महापौर संदीप जोशी यांनी शहरातील वाढते अतिक्रमण व पार्किग समस्येवरील चर्चेच्या उत्तरात दिले. तसेच शहरात ट्रॅव्हल्स रस्त्यांवर उभ्या केल्या जातात. ट्रकची वाहतूक होते. यामुळे अपघात होतात. यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी माजी महापौर प्रवीण दटके यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केल जाईल. ही समिती ३० डिसेंबरपर्यंत आपला अहवाल सादर करेल. त्यानंतर शहरात ट्रॅ व्हल्स उभ्या राहणार नाही. अशा स्वरूपाचा धोरणात्मक निर्णय महापालिका घेणार असल्याचे जोशी यांनी सांगितले.

काँग्रेस अतिक्रमण हटविण्याच्या विरोधात-दटके
शहरातील प्रमुख रस्ते, सार्वजनिक ठिकाणावरील अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही शहराच्या भल्यासाठी आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई सुरू आहे. महापौरांनी शहराच्या भल्यासाठी निर्णय घेतला आहे. अतिक्रमणाच्या बाजुने व विरोधात कोण आहे, हे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेवकांनी अतिक्रमण कारवाई विरोधात भूमिका घेतली आहे. नगरसेवक प्रकाश भोयर यांनी सभागृहात जी अतिक्रमणाच्या विरोधात भूमिका मांडली. त्यात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न झाला. काँग्रेस अतिक्रमण हटविण्याच्या विरोधात असल्याची भूमिका ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके यांनी सभागृहात मांडली.

 

 

Web Title: Confrontation over the issue of encroachment: Congress members from Municipal House

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.