देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
कोरोनाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनदरम्यान झालेल्या स्थलांतरीत मजुरांच्या मृत्यूबाबतची आकडेवारी आपल्याकडे नसल्याची माहिती केंद्र सरकारने दिली होती. ...
कालची संपूर्ण रात्र संसद भवनाच्या आवारात आंदोलन करणाऱ्या आठ निलंबित खासदारांची भेट घेण्यासाठी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह हे चहापाणी घेऊन आज सकाळीच आंदोलनस्थळी दाखल झाले आहे. ...
महापौर किशोरी पेडणेकर यांनी काँग्रेसचे रवी राजा यांची विरोधी पक्षनेते पदी केलेल्या नियुक्तीला जूनमध्ये शिंदे यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. भाजपची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. ...
कृषी क्षेत्रात बदल घडविण्याची क्षमता असलेल्या व संसदेत मंजूर झालेल्या विधेयकांना विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. विधेयकाचा विरोध करणाऱ्या काँग्रेसने याच सुधारणांचे आश्वासन ...