कॉंग्रेसच्या आश्वासनांची मोदी सरकारने पूर्तता केली : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 11:05 PM2020-09-21T23:05:40+5:302020-09-21T23:07:52+5:30

कृषी क्षेत्रात बदल घडविण्याची क्षमता असलेल्या व संसदेत मंजूर झालेल्या विधेयकांना विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. विधेयकाचा विरोध करणाऱ्या काँग्रेसने याच सुधारणांचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात केंद्रातील मोदी सरकारने काँग्रेसच्या या आश्वासनाची पूर्तता केली आहे. काँग्रेसचा शेतकरी हिताच्या मुखवट्याचा भंडाफोड करण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

Modi government fulfills Congress promises: Devendra Fadnavis | कॉंग्रेसच्या आश्वासनांची मोदी सरकारने पूर्तता केली : देवेंद्र फडणवीस

कॉंग्रेसच्या आश्वासनांची मोदी सरकारने पूर्तता केली : देवेंद्र फडणवीस

Next
ठळक मुद्देविधेयकांना विरोध करणाऱ्या काँग्रेसवर टीकास्त्र

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : कृषी क्षेत्रात बदल घडविण्याची क्षमता असलेल्या व संसदेत मंजूर झालेल्या विधेयकांना विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. विधेयकाचा विरोध करणाऱ्या काँग्रेसने याच सुधारणांचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात केंद्रातील मोदी सरकारने काँग्रेसच्या या आश्वासनाची पूर्तता केली आहे. काँग्रेसचा शेतकरी हिताच्या मुखवट्याचा भंडाफोड करण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
नागपुरात सोमवारी आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते. या कृषी विधेयकांमुळे शेतकऱ्यांना कुठेही बाजार मिळू शकतो. आतापर्यंत शेतकऱ्यांना आपले पीक विकण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीला ८ टक्क्यांपर्यंत सेस द्यावा लागत होता. मात्र आता असे होणार नाही. आपले पीक कुठे व कितीमध्ये विकायचे याचा निर्णय शेतकरी घेऊ शकतील. त्यांना दलालांपासून मुक्ती मिळेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात तत्कालीन आघाडी सरकारने २००६ मध्ये कॉन्टेक्ट फार्मिंगला परवानगी दिली होते. त्याचे चांगले निकाल समोर आले आहेत. काँग्रेसनेच खासगी कृषी बाजार समितीला परवानगी दिली होती. आज या बाजारांमध्ये शेतकऱ्यांना चांगले भाव मिळत आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी जारी केलेल्या घोषणापत्रात काँग्रेसने कृषी उत्पादनांच्या आंतरराज्यीय विक्रीला परवानगी देणे, शेतकऱ्यांना कुठेही विक्रीची परवानगी देणे यांचे आश्वसान दिले होते. संसदेत संमत झालेल्या विधेयकात याच आश्वासनांना मंजुरी देण्यात आली आहे. आता केवळ राजकीय कारणांमुळे काँग्रेस व त्यांचे मित्र पक्ष विरोध करत आहेत, असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले. काही लोकांचा फायद्यासाठी या विधेयकाला विरोध आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना व काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्यावर टीका केली.

शेतकऱ्यांच्या आंदोलनात काँग्रेसचे झेंडे
९० टक्के शेतकरी हे कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ आहेत. उर्वरित १० टक्के शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात येत आहे. भाजप यासंदर्भात सत्य समोर आणत आहे. पंजाबमध्ये विधेयकाला विरोध होत असताना काँग्रेसचे झेंडे दिसून आले. भाजपा मतांसाठी निर्णय करत नाही. बिहारमध्ये याचा प्रभाव राहणार नाही कारण विधेयकातील तरतुदी तेथे अगोदरपासूनच लागू आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

Web Title: Modi government fulfills Congress promises: Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.