छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता. Read More
गेल्या काही दिवसांपासून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. तसेच राज्याच्या २.६ टक्के मृत्यूदराच्या तुलनेत जिल्ह्याच्या मृत्यूदर १.६ टक्के इतकाच असल्याने जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी वाटते. ...
मुस्लीम संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची विविध मागण्यांसंदर्भात नाशिक कार्यालयात भेट घेतली. यावेळी या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच या प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक घेण्याचे आश्वासन भुजबळ यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. ...
कोणत्या बंगल्यांवर किती खर्च करण्यात आला याची यादी बघितली असता, मंत्र्यांच्या बंगल्यांना कोरोना वा आर्थिक संकटाची कोणतीही झळ बसली नसल्याचे स्पष्ट होते. ...
Shiv Sena MLA Pratap Sarnaik, NCP Chhagan Bhujbal News: विरोधीपक्षातील एखादा नेता जो व्यक्ती केंद्रसरकारच्या विरोधात जास्त बोलेल त्याला ईडीची भीती दाखवली जात आहे ...
१ नोव्हेंबर हा कर्नाटक राज्याचा स्थापना दिवस सीमाभागात ‘काळा दिवस’ म्हणून पाळला जातो. यंदा महाराष्ट्रातील मंत्रीही काळ्या फिती लावून हा दिवस पाळणार आहेत. रविवारी हा दिवस येत असल्याच्या पार्श्वभूमीवर सीमावासीयांच्या भावना तीव्र आहेत. ...