बीडचे पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांची भारत राखीव बटालियन गट क्र. १३ वडसा देसाईगंज, जि.गडचिरोली येथे समादेशक पदावर बदली झाली आहे. त्यांच्या जागी बीड पोलीस अधीक्षकपदावर नागपूरवरुन हर्ष पोद्दार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
गेवराई तालुक्यातील बोरगाव व गुंतेगाव येथून अवैधरीत्या वाळू उपसा करून ट्रॅक्टरमध्ये घेऊन जात असताना तहसीलदार, तलाठी व मंडळ अधिकारी यांनी रविवार रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास पकडून दोन ट्रॅक्टर व दोन मोटार सायकलसह १६ लाखाचा मुदेमाल ताब्यात घेतला ...