बाळा नांदगावकर Bala Nandgaonkar हे मनसेचे प्रमुख नेते आहेत. मनसेच्या स्थापनेच्या आधीपासूनच ते राज ठाकरे यांच्यासोबत आहेत. राज ठाकरे यांचे निकटवर्ती म्हणून त्यांना ओळखले जातात. मनसेत प्रवेश केल्यानंतर २००९ साली त्यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीत त्यांनी शिवसेना आमदार दगडू सकपाळ यांचा पराभव केला. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी बाळा नांदगावकरांचा पराभव केला. २०१९ ची विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली नाही. Read More
Raj Thackeray: आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आता तयारीला लागले आहेत. यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS) देखील कंबर कसली आहे. ...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या महाराष्ट्र दौरा करुन पक्षबांधणी करतायंत. या दौऱ्यात त्यांनी जिल्हा कार्यकारिणीत अनेक महत्त्वाचे बदल केले, त्यामुळे अनेक जण दुखावले गेले. राज ठाकरे पुणे दौऱ्यावर पोहचण्यापूर्वीच मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षाला र ...